कोरोनाबाधितांच्या वाढीबाबत आढावा घेणार : महापौर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:11 AM2021-02-16T04:11:56+5:302021-02-16T04:11:56+5:30
पुणे : शहरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत व ते कोणत्या भागात अधिक वाढत आहेत. ...
पुणे : शहरातील वाढत्या कोरोनाच्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर, कोरोनाचे रुग्ण का वाढत आहेत व ते कोणत्या भागात अधिक वाढत आहेत. याचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी संबंधित विभागांची बैठक घेतली जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ‘लोकमत’ला दिली.
शहरात गेल्या सात दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्या वाढत आहे. याबाबत मोहोळ म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेले निर्बंध शिथिल केल्याने शहरातील सर्व व्यवहार पूर्ववत सुरू झाले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढल्याचे दिसून आले आहे. परंतु ही रुग्णवाढ संपूर्ण शहरात नसून, शहराच्या विशिष्ट भागात आहे. त्यामुळे कॅन्टोन्मेंट झोन करणे अथवा लॉकडाऊन करणार हा आता पर्याय नाही. रुग्णवाढीमागील करणे काय आहेत, ती शोधून पुढील उपाययोजना केल्या जातील. याकरिता मंगळवारी आरोग्य विभागासह महापालिकेच्या संबंधित विभागाची बैठक घेऊन पुढील नियोजनाची दिशा ठरविण्यात येणार आहे.