भूसंपादनाचा प्रश्न सोडविणार
By admin | Published: December 9, 2014 11:34 PM2014-12-09T23:34:31+5:302014-12-09T23:34:31+5:30
येथील औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचच्या विस्तारास परिसरातील तीन गावांतून शेतक:यांचा प्रचंड विरोध आहे.
Next
जेजुरी : येथील औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक पाचच्या विस्तारास परिसरातील तीन गावांतून शेतक:यांचा प्रचंड विरोध आहे. शेतक:यांना योग्य न्याय देण्यात यावा, यासाठी आपण स्वत: मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे, असे आश्वासन भाजपाच्या नेत्या संगीताराजे निंबाळकर यांनी दिले आहे.
पुरंदर तालुक्यातील कोळविहिरे येथील घोरपडेवाडी येथे जेजुरी एमआयडीसीच्या पाचव्या टप्प्यातील विस्तार वाढीस कोळविहिरे, मावडी कडेपठार आणि नावळी येथील शेतक:यांचा विरोध आहे. राज्यात सत्ताबदल झाल्याने या विरोधाची नव्याने बांधणी करण्यासाठी एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
बैठकीला भाजपाच्या नेत्या संगीताराजे निंबाळकर, तसेच कोळविहिरेचे माजी सरपंच अॅड. दशरथ घोरपडे, पंचायत समितीच्या माजी सभापती मैनाताई जाधव, नावळीचे माजी सरपंच गेनबा म्हस्के, मावडीचे प्रकाश भामे आदींसह शेतकरी उपस्थित होते.
या वेळी निंबाळकर यांनी शेतक:यांची बाजू ऐकून घेतली. यानंतर त्यांनी शेतक:यांना मार्गदर्शन करताना भूसंपादनासाठी वाटाघाटी व दर ठरवण्यासाठी पुणो येथे अल्पबचत भवन येथे 11 डिसेंबर रोजी बैठक ठरवलेली आहे. तशा नोटिसाही शेतक:यांना देण्यात आलेल्या आहेत. भूसंपादनाला शेतक:यांचा विरोध असतानाही काही राजकारणी स्वत:च्या फायद्यासाठी भूसंपादनाचा घाट घालीत आहेत. आपण याबाबतीत मुख्यमंत्र्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन बोलणार आहोत.
शेतक:यांना न्याय दिला जाईल, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. तीनही गावांतील शेतक:यांचा या भूसंपादनाला शंभर टक्के विरोध असतानाही शासनाकडून अशा बैठकीचे आयोजन केले जाते, याची शेतक:यांत प्रचंड चीड आहे. भाजपाच्या नेत्या संगीताराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पुढील आंदोलन उभारले जाईल. त्यांच्याकडूनच आपल्याला न्याय मिळेल, असे अॅड. दशरथ घोरपडे
यांनी या वेळी सांगितले. पोपट
झगडे यांनी प्रास्ताविक व आभार मानले. (वार्ताहर)