.. त्या सर्व गावांमध्ये औषधफवारणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:11 AM2021-05-19T04:11:16+5:302021-05-19T04:11:16+5:30
कळस : पळसदेव (ता. इंदापूर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांची निर्जंतुक फवारणी करून घेण्यात येणार आहे. यासाठी ...
कळस : पळसदेव (ता. इंदापूर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या सर्व गावांची निर्जंतुक फवारणी करून घेण्यात येणार आहे. यासाठी लागणारे रसायन आपण स्वत: देणार असल्याचे जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांनी सांगितले.
तालुक्यातील आरोग्यविषयक सुविधांची चाचपणी करण्यासाठी पळसदेव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर माने यांनी रुग्ण कल्याण समितीची मीटिंग घेतली. या वेळी त्यांनी ही माहिती दिली. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत हिंगणगाव, पिंपरी खु, गलांडवाडी नं. १, कालठण नं. १, अगोती नं. १, वरकुटे बु, लोणी देवकर, न्हावी अशी एकूण ८ उपकेंद्रे येतात. या सर्वच केंद्रांवरील उपाययोजनांचा या वेळी आढावा घेण्यात आला. आरोग्य केंद्रावर उपचारासाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना या वेळी संबंधितांना दिल्या. या भीषण परिस्थितीत संपूर्ण आरोग्य व्यवस्था, कर्मचारी ज्या पद्धतीने हाताळत आहेत, या गोष्टीचे कौतुक करत आपल्याला आरोग्य कर्मचाऱ्यांचे काम अभिमानास्पद वाटते, असे माने यांनी सांगितले.
आजच्या या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, पंचायत समिती सदस्य बाळासाहेब काळे, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील गावडे, सरपंच इंद्रायणी मोरे, सदस्य मेघराज कुचेकर, बंडू दादा काळे, नंदाताई बनसोडे, स्नेहल शहा, डॉ. रणजित जाधवर, पोलीस पाटील अनिल कुचेकर, कैलास भोसले, अमोल मोरे, निलेश रंधवे, आरोग्यसेवक, सेविका, आशाताई आदी उपस्थित होते.
——————————————
...निवाऱ्याची सोय स्वखर्चाने करणार
पळसदेव प्राथमिक आरोग्य केंद्र व त्या अखत्यारीत येणाऱ्या ८ उपकेंद्रांवरील एकूण ४६ आशा स्वयंसेविका सॅनिटायझरही प्रवीण माने यांच्या वतीने देण्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच आरोग्य सुविधा मिळविण्यासाठी तसेच लसीकरणसाठी लांबून येणाऱ्या नागरिकांना निवाऱ्याची सोय व बैठक व्यवस्था आपण स्वत: स्वखर्चाने करणार असल्याचे या वेळी माने यांनी जाहीर केले.
—————————————————