मुंबईनंतर पुण्यात सुरु होणार; नववर्षात डबल डेकर बस धावणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 01:35 PM2022-12-30T13:35:54+5:302022-12-30T13:36:10+5:30

शहराची वाढती लोकसंख्या पाहता या बसची संख्या वाढवणे गरजेचे

Will start in Pune after Mumbai; Double decker bus will run in the new year? | मुंबईनंतर पुण्यात सुरु होणार; नववर्षात डबल डेकर बस धावणार?

मुंबईनंतर पुण्यात सुरु होणार; नववर्षात डबल डेकर बस धावणार?

googlenewsNext

पुणे : शहरात प्रवासी वाहतूक सेवा देणाऱ्या पीएमपीएमएलच्या ताफ्यात एकूण २,१४२ बस आहेत. यातील ११३० बस ठेकेदाराच्या, तर १०१२ बस पीएमपीच्या स्व-मालकीच्या आहेत. शहराची वाढती लोकसंख्या पाहता या बसची संख्या वाढवणे गरजेचे आहे. याच अनुषंगाने येत्या वर्षात पुणे शहरात मुंबईच्या धर्तीवर डबल डेकर बस सुरू करता येतील का, यासंदर्भातील हालचाली सुरू झाल्या आहेत.

नुकत्याच झालेल्या पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालकांच्या बैठकीत यासंदर्भातील प्राथमिक चर्चा झाली. सध्या सुरू असलेल्या बस आणि डबल डेकर बस आणल्या तर त्यातून मिळणारे तुलनात्मक उत्पन्न, वाहतूक पोलिसांचे म्हणणे याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेतला जाईल. सध्या ही चर्चा प्राथमिक स्तरावरच असल्याची माहिती सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

मुंबईमधील बेस्टसोबत यासंदर्भात चर्चा करणार 

डबल डेकर बस पुण्यात सुरू करण्याबाबत झालेल्या प्राथमिक चर्चेत, मुंबईमध्ये डबल डेकर बस धावत आहेत. याचे कारण म्हणजे तिथल्या पायाभूत सुविधा पुण्यापेक्षा वेगळ्या आहेत. आम्ही मुंबईमधील बेस्टसोबत यासंदर्भात चर्चा करणार आहोत. या बस पुण्यासह, पिंपरी चिंचवडमध्ये किती यशस्वी होतील यासाठीचा एक अहवाल तयार केला जाईल. त्यानंतर ठोस निर्णय घेतला जाईल. - ओमप्रकाश बकोरिया, व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल

Web Title: Will start in Pune after Mumbai; Double decker bus will run in the new year?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.