पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका होणार? शासनाने मागविला अहवाल

By ज्ञानेश्वर भंडारे | Published: January 25, 2024 03:54 PM2024-01-25T15:54:56+5:302024-01-25T15:56:02+5:30

याबाबत अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे....

Will there be a new municipality in Pune district? Report called for by the government | पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका होणार? शासनाने मागविला अहवाल

पुणे जिल्ह्यात नवीन महापालिका होणार? शासनाने मागविला अहवाल

पिंपरी :पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेनंतर आता पुणे जिल्ह्यात आणखी एक महापालिकेची स्थापना होणार आहे. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण केली जाणार आहे. याबाबत अभिप्रायासह विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून राज्य शासनाने अहवाल मागविला आहे.

पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात गावांचा समावेश होऊन महापालिकांची हद्दवाढ झालेली आहे. त्यामुळे पुणे व पिंपरी-चिंचवड शहरालगतच्या परिसरातील नवीन गावांचा या दोन्ही महापालिकेत समावेश करणे योग्य होणार नाही. चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील गावांची नवीन महापालिका निर्माण करणे याबाबत मागणी होत आहे. चाकण, आळंदी आणि राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या परिसरालगतच्या आसपासच्या गावांचा समावेश करून नवीन स्वतंत्र महापालिका करणे राज्य शासनाच्या विचाराधिन आहे.

त्यासाठी चाकण नगरपरिषद, आळंदी नगरपरिषद व राजगुरू नगरपरिषद तसेच त्यांच्या लगतच्या परिसरातील आसपासच्या गावांचे एकूण क्षेत्रफळ, लोकसंख्या, हद्द याबाबतचा तपशिल घ्यावा. तिन्ही नगरपरिषदेतील हद्दीची एक स्वतंत्र महापालिका स्थापन करण्याबाबत जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त, पिंपरी-चिंचवड, पुणे महापालिका आयुक्त आणि चाकण, आळंदी, राजगुरू नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांचा अहवाल मागवून घ्यावा आणि अभिप्रायासह शासनाने विभागीय आयुक्त सौरभ राव यांच्याकडून अहवाल मागविला आहे.

हद्दवाढी नको महापालिकाच बनवा...

पत्र राज्य शासनाच्या उपसचिव प्रियंका कुलकर्णी यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त यांना पाठवले आहे. त्यामुळे एकीकडे मागील आठ वर्ष हद्द वाढीच्या विषयावर अडकून पडलेल्या तिन्ही नगरपरिषदा मिळून नवीन महानगरपालिका होणार का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच स्थानिक नेते व नागरिकांचीही स्वतंत्र्य महापालिकेची मागणी होती.

Web Title: Will there be a new municipality in Pune district? Report called for by the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.