विमानतळ रस्त्यावरील वाहतूककोंडी फुटणार का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:08 AM2021-06-29T04:08:26+5:302021-06-29T04:08:26+5:30

पुणे: गेल्या काही वर्षांपासून अग्रसेन शाळा ते बालग्रामपर्यंतच्या सुमारे ३०० मीटरच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आळंदी रस्ता व ...

Will there be traffic congestion on the airport road? | विमानतळ रस्त्यावरील वाहतूककोंडी फुटणार का ?

विमानतळ रस्त्यावरील वाहतूककोंडी फुटणार का ?

Next

पुणे: गेल्या काही वर्षांपासून अग्रसेन शाळा ते बालग्रामपर्यंतच्या सुमारे ३०० मीटरच्या रस्त्याचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे आळंदी रस्ता व विमानतळ रस्त्यावरील वाहतूककोंडीचा प्रश्न कायम आहे. मात्र, येत्या मंगळवारी (दि.२९) राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित मंत्रालयात वडगाव शेरी मतदारसंघातील विविध प्रश्नांवर चर्चा होणार आहे. त्यात तरी ही कोंडी फोडण्यासाठी तोडगा निघेल का ? यावर सर्वांचे लक्ष आहे.

येरवडा परिसरातील आंबेडकर महाविद्यालयांपासून अग्रसेन शाळेपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, अग्रसेन शाळा ते कॉमर्स झोन दरम्यानच्या तीनशे मीटर रस्त्याचे काम करण्यासाठी महसूल विभागाकडे असणारी जमीन मिळण्यास अडचणी येत आहेत. कॉमर्स झोनपासून ते टिंगरे नगर येथील शाहू चौकापर्यंतच्या रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे केवळ ३०० मीटर रस्त्याचे काम पूर्ण होऊ न शकल्याने आळंदी रस्ता व विमानतळ रस्त्यावरील वाहतुकीवरील ताण कमी झालेला नाही.

पालिकेच्या वाहतूक विभागाच्या अहवालानुसार या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास इतर रस्त्यांवरील वाहतुकीचा ताण सुमारे ४० टक्‍क्‍यांनी कमी होणार आहे. अग्रसेन शाळेने रस्त्यासाठी आवश्यक असणारी जागा देण्यास तयारी दर्शविली आहे. बालग्रामची जागा ही महसूल विभागाची असून ३० वर्षांसाठी ती जागा बालग्रामला दिली होती. बालग्रामचा ३० वर्षांचा करार संपुष्टात आला असून, पुढील करारासाठी शासनाकडे बालग्रामने प्रस्ताव पाठविला आहे.

पुणे पालिकेने या जागेच्या हस्तांतरणासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठपुरावा केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना एक एकरपर्यंत जागा देण्याचे अधिकार आहेत. परंतु, बाजारभावानुसार या जागेचे मूल्य एक कोटीच्यावर असल्यामुळे ही जागा पलिकेला अद्याप हस्तांतरित झाली नाही. त्यामुळे या जागे संदर्भातील फाईल मंत्रालयात महसूल व नगररचना विभागाकडून आता वित्त विभागाकडे पाठविण्यात आली आहे. वडगाव शेरी मतदारसंघाचे आमदार डॉ. सुनील टिंगरे व माजी महापौर सिद्धार्थ धेंडे यांनी याबाबत शासनाकडे पाठपुरावा केला.

Web Title: Will there be traffic congestion on the airport road?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.