Pune Water News: तुमच्या भागात पाणी येणार आहे का? पुणे शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 18:00 IST2025-04-11T17:59:38+5:302025-04-11T18:00:32+5:30
दुरुस्तीचे कामे झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले

Pune Water News: तुमच्या भागात पाणी येणार आहे का? पुणे शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा गुरुवारी बंद
पुणे: आगम मंदिर येथे मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती करण्यासाठी आणि राजमाता भुयारी मार्ग येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी गुरुवारी (दि.१७) शहराच्या दक्षिण भागाचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचे कामे झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी उशिरा कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने सांगितले आहे.
आगम मंदिर येथे मुख्य दाब जलवाहिनी मधून पाण्याची गळती होते, ही गळती थांबविणे व राजमाता भुयारी मार्ग येथे स्थापत्य विषयक तातडीचे देखभाल दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहेत. त्यामुळे गुरुवारी खालील परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
पाणीपुरवठा बंद असणारा भाग
निलगिरी चौक, चिंतामणी ज्ञानपीठ ते त्रिमूर्ती चौक भारती विद्यापीठ, भारती विहार, चंद्रभागानगर, सावंतविहार सावंत गार्डन, वंडर सिटी, कदम प्लाझा, ज्ञान्सी गार्डन, माणिक मोती, नारायणी धाम परिसर, दत्तनगर, संतोषनगर, आबेगाव बुद्रूक गावठाण, आंबेगाव खुर्द, जांभूळवाडी रोड, धबाडी व परिसर इ.