Vasant More: एक तारखेच्या आत विकेट टाकणार? वसंत मोरे यांना धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2024 20:00 IST2024-07-19T19:59:46+5:302024-07-19T20:00:15+5:30
मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर व धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी, वसंत मोरेंची मागणी

Vasant More: एक तारखेच्या आत विकेट टाकणार? वसंत मोरे यांना धमकी
कात्रज : शिवसेना उद्धव ठाकरे गटात नुकतेच प्रवेश केलेले नेते माजी नगरसेवक वसंत मोरे यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आलेली आहे. याबद्दल वसंत मोरे यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असून पोलिसां कडून पुढील तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी सांगितले.
वसंत मोरे प्रवास करत असताना एका अनोळखी नंबर वरून त्यांना कॉल आला व शिवीगाळ करण्यात आली. कामात असल्याने मोरे यांनी दुर्लक्ष केले परंतू परत दुसऱ्या नंबर कॉल आला त्यानंतर मोरे यांनी भाचा प्रतीक यांना त्या नंबर वर कॉल करण्यास सांगितले. प्रतीक यांनी कॉल केल्यानंतर त्यांना देखील शिवीगाळ करत वसंत मोरे यांची एक तारखेच्या आत विकेट टाकणार अशी धमकी देण्यात आली. असे तक्रार अर्जात मोरे यांनी म्हंटले आहे. तसेच यामागे मनसे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर असल्याचा संशय असल्याने त्यांच्यावर व धमकी देणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करावी अन्यथा भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन वर मोर्चा काढण्यात येईल असे मोरे यांनी तक्रारीत म्हटले आहे.