बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार: थोपटे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:12 AM2021-08-19T04:12:32+5:302021-08-19T04:12:32+5:30
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, प्रकाश गरुड, माऊली शिंदे, सचिन तारु, महेश तांडगे, सुभाष मांगडे, प्रमोद थोपटे, संग्राम ...
यावेळी जिल्हा परिषद सदस्य विठ्ठल आवाळे, प्रकाश गरुड, माऊली शिंदे, सचिन तारु, महेश तांडगे, सुभाष मांगडे, प्रमोद थोपटे, संग्राम गरुड, सागर शिवतरे, मदन खुटवड, युवराज येलगुडे, शामराव जेधे, गणेश आवाळे यांच्यासह अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. बैलगाडा शर्यतीची राज्याला सुमारे ४०० वर्षांची परंपरा आहे. ही परंपरा कायम टिकावी म्हणून बैलगाडा शर्यतीस शासनाने परवानगी द्यावी, अशी शेतकरी व बैलगाडा चालक-मालकांची मागणी आहे. अनेक गावात यात्रेत बैलगाडा शर्यत आयोजित केल्या जातात. मात्र, सध्या बंदी असल्यामुळे शेतकरी बैलगाडा मालकांची निराशा झाली असून पुन्हा सुरू करण्याची मागील जोर धरत आहे.
आमदार थोपटे म्हणाले की, बंदी असली तरी शर्यतीचा सराव घेण्यासाठी भोर व राजगडचे पोलीस निरीक्षक यांच्याशी चर्चा करून येत्या हिवाळी अधिवेशनात बैलगाडा शर्यतीसंर्दभात प्रश्न उपस्थित करून बैलागाडा मालक-चालकांना न्याय मिळवून दिला जाईल.