वाघोलीतील कचऱ्याने महापालिकेचे डोकेदुखी वाढणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:13 AM2021-01-25T04:13:12+5:302021-01-25T04:13:12+5:30

वाघोली : वाघोली गाव लवकरच पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी प्रशासकीय स्तरांवर जोरदार तयारी झाली आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबर नागरी सुविधा ...

Will Wagholi waste increase municipal headaches? | वाघोलीतील कचऱ्याने महापालिकेचे डोकेदुखी वाढणार का?

वाघोलीतील कचऱ्याने महापालिकेचे डोकेदुखी वाढणार का?

Next

वाघोली : वाघोली गाव लवकरच पुणे महापालिकेत समाविष्ट होण्यासाठी प्रशासकीय स्तरांवर जोरदार तयारी झाली आहे. वाढत्या नागरीकरणाबरोबर नागरी सुविधा देखील उपलब्ध करून देण्याचे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. आताचा विचार केला तर वाढत्या लोकसंख्येबरोबर वाघोलीमधील कचऱ्याची मोठी समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित होत आहे.

वाघोलीत नगर रोड, केसनंद रोड, आव्हाळवाडी रोड, लोहगाव रोड, वाघोली, खांदवेनगर येथील हद्द येथे रोडच्या कडेला सर्रासपणे जागोजागी नागरिकांच्या कडून कचरा टाकला जात आहे. तर हाॕॅटेल व्यावसायिक, सोसायटीधारक, नागरिक यांच्याद्वारे जाता येता कचरा थेट रस्त्यांच्या कडेला दुचाकीवरून किंवा चारचाकीतून फेकला जात आहे. त्या दृष्टीने हा भाग जणू काही कचरा फेकण्यासाठी हक्काची जागा असल्यासारखा वापरला जात आहे. यामुळे सर्वच वाघोलीतील राहणाऱ्या नागरिकांना आपली वाघोली सुंदर वाघोलीचा विसर पडला असल्याचे दिसून येत आहे. परिणामी अस्वच्छता आणि दुर्गंधींचा सामना या रस्त्याने आणि परिसरातून ये-जा करणाऱ्यांना नागरिकांना करावा लागत आहे.

वाघोलीत एक माणूस दररोज अंदाजे सरासरी ५०० ग्रॅम कचरा तयार करतो. या कचऱ्यातील ३०० ग्रॅम कचरा हा विघटन होणार असतो. त्यामुळे दररोज अंदाजे ३० ते ४० टन घनकचरा तयार होतो. या कचऱ्यातून ओला कचरा, सुका कचरा,जैविक कचरा वेगळा करण्याची कोणतीही यंत्रणा सध्या तरी अस्तित्वात नाही. वाघोली ग्रामपंचायतच्या वतीने काही दिवसापुर्वी ओला, सुका, कचरा वेगळ्या पद्धतीने जमा करून त्यांचे विघटन, त्याची शास्त्रोक्त विल्हेवाट, कचऱ्यापासून कोळसा, आॕइल, गॕस ,खतनिर्मिती सारखा प्रकल्प उभा केला होता. परंतु, त्याच्या योग्य नियोजनाअभावी व्यवस्थित कार्यन्वित झाला नाही.

त्यामुळे कचरा प्रश्नावरून बिकट अवस्था झाली आहे. यामुळे कचऱ्याबरोबरच पाणी, वाहतूककोंडी, अतिक्रमण, अश्या अनेक समस्याठी महानगरपालिकेची डोकेदुखी ठरणार का? हेच येत्या काळात आपणास पाहावे लागणार आहे.

कोट

वाघोली मनपामध्ये समाविष्ट झाल्यानंतर खासदार गिरीश बापट, पुणे मनपाचे महापौर व आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा करून कचरा, पाणी व वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

- संदीप सातव, संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा युवा मोर्चा

कोट

वाघोलीतील कचरा समस्या सोडविण्यासाठी कचरावर प्रकिया करणाऱ्या प्रकल्पांना प्राधान्य देत अद्यावत मोठे युनिटची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. भामा आसखेडचे पाणी आणि वाहतूककोंडी बाबतीत पाच फ्लायओर बांधण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सातत्याने पाठपुरावा चालू आहे.

- अशोक पवार, आमदार, शिरुर-हवेली

फोटो : वाघोलीमध्ये महामार्गावर नागरिक कचरा टाकत असल्याने ठिकठिकाणी असे कचऱ्याचे ढीग साठलेले दिसत आहे.

Web Title: Will Wagholi waste increase municipal headaches?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.