सौंदर्य स्पर्धा जिंकण्यासाठी....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:10 AM2021-07-27T04:10:07+5:302021-07-27T04:10:07+5:30

आपण जजेससमोर जास्तीत जास्त presentable कसे दिसावे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही खूप सुंदर व सक्षम ...

To win a beauty contest .... | सौंदर्य स्पर्धा जिंकण्यासाठी....

सौंदर्य स्पर्धा जिंकण्यासाठी....

googlenewsNext

आपण जजेससमोर जास्तीत जास्त presentable कसे दिसावे हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही खूप सुंदर व सक्षम असाल तरी सौंदर्यस्पर्धा जिंकण्यासाठी बऱ्याच गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. सौंदर्य स्पर्धा जिंकण्यासाठी अगदी आपल्या योग्य केशरचनेपासून (हेअरस्टाइल) ते योग्य मेकअप व इव्हनिंग गाउन निवडण्यापर्यंत स्वतःचा वेळ दिला पाहिजे. त्यानंतर आपल्या प्रतिभेची वैशिष्ट्ये वाढवण्याची व सराव करण्यासाठीही वेळ दिला पाहिजे. मुलाखतीत विचारण्यात येणारे प्रश्न तयार करा, जेणेकरून तुम्ही QA (प्रश्न- उत्तर) राऊंड तुम्ही सहजतेने पार करू शकाल आणि मुकुट मिळवण्यासाठी कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही.

पहिल्यांदा कोणतंही काम आपल्याला थोडं त्रासदायक जाणवते, परंतु जर आपल्याला काही बनण्याची व स्वतःला सिद्ध करण्याची इच्छा असेल तर आपण कोणत्याही कार्य सहजतेने करू शकता, फक्त आपल्याला योग्य मार्गदर्शनाची गरज असते. स्वत:वर विश्वास ठेवा.

स्पर्धेत उतरल्यानंतर तुमच्या सभोवती अनेक मुली ज्या तुमच्यापेक्षा सुंदर असतील व त्यांचे पोशाखही तुमच्यापेक्षा हटके असतील, तेव्हा तुम्ही स्वत:बद्दल कॉन्फिडंट असणं महत्त्वाचं असतं. आपला आत्मविश्वास गमावू नका, स्वतःला कमी लेखू नका, स्वत:ला आत्मविश्वासाने परिपूर्ण ठेवा. आपला आपल्यावर पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे की आपण पण सगळ्यात उठून दिसणार आहोत.

आय कॉन्टॅक्ट :

समोरच्या व्यक्तीशी बोलताना समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यांशी संपर्क साधणे खूप महत्त्वाचे आहे. आपला आय कॉन्टॅक्ट लेव्हल आपला आत्मविश्वास दर्शविते आणि स्वत:बद्दल अभिमान व्यक्त करते म्हणूनच स्टेजवर जाताच जजेसचे लक्ष आपल्याकडे वेधून घेणे फार महत्त्वाचे आहे. सौंदर्य स्पर्धेतच नाही तर नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेलात तरीही याचा तुम्हाला उपयोग होईल. आय कॉन्टॅक्टमुळे आपण समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याकडे लक्ष देत आहात हे दर्शवले जाते .

वास्तववादी ध्येय ठेवा :

प्रत्येकाचे मुख्य लक्ष्य जिंकणे हेच असले तरी याव्यतिरिक्त आपल्याला काही इतर ध्येयदेखील सेट करणं महत्त्वाचं आहे. जसे की नवीन मैत्री जोडणे, नवीन काही शिकणे व स्वतःला टॉप १० मध्ये आणण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. जरी आपल्याला मुकुट मिळाला नाही तरी आपण खूप काही शिकलो यातून जिंकल्याचे समाधान मिळाले पाहिजे.

स्वतः अभ्यास करा

जितका तुम्ही स्वतः सराव कराल तितके चांगले काम कराल. म्हणून स्वत:वर विजय मिळविण्याकरिता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सराव. आपण एकदा हरलो तर पुन्हा प्रयत्न करा आणि पुन्हा पुन्हा जिंकण्याचा प्रयत्न करा.

स्मितहास्य

स्टेजवर जाण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर सतत स्मितहास्य ठेवणे खूप खूप महत्त्वाचे आहे. कधीकधी असे घडते की आपली स्माईल बनावट आणि कृत्रिम दिसते. मनापासून आणि नॅचरल स्माइल असणं गरजेचं आहे. त्यासाठी एखादी गमतीशीर गोष्ट मनात ठेवली पाहिजे. मजेशीर गोष्टींचा विचार केला पाहिजे. जेणेकरून तुमचे स्मितहास्य बनावटऐवजी वास्तविक दिसेल.

चांगली झोप घ्या :

आपला चेहेरा रिफ्रेशिंग दिसण्यासाठी योग्य व पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. स्पर्धेला जाण्याआधी जागरण करू नये. रात्री उशिरा झोपल्यामुळे चेहेऱ्यावर थकवा दिसून येतो. म्हणूनच टवटवीत चेहरा व तजेलदार त्वचेसाठी आपल्यासाठी रात्री झोपणे खूप महत्त्वाचे आहे.

आनंदी रहा आपण जेव्हा स्पर्धेत उतरता तेव्हा प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्या, नवीन मैत्रीसोबत नव्या आठवणींना उजाळा द्या. जेणेकरून ते क्षण आयुष्यभर आठवण बनून राहतील. जरी तुम्ही स्पर्धा जिंकला नाही तरी ती हार आहे असा समजू नका. पुन्हा नव्याने सराव करा, स्वत:ला सकारात्मक ऊर्जाने परिपूर्ण ठेवा, जेणेकरून इतरही आपल्याकडे पाहून आपल्याकडून प्रेरणा घेतील.

वेळेला महत्त्व द्या :

तुम्ही कुठेही जा. तिथे नेहमी वेळेला महत्त्व द्या. जिथे पण जा. वेळेवर जा. ज्या स्पर्धेसाठी तुम्ही इतकी मेहेनत घेत आहात तिथे एक सेकंदपण व्यर्थ घालवू नका.

निष्कर्ष

विजेते घोषित होता जर तुमचा नाव घोषित नाही झालं तर नाराज ना होता हसत हसत विजेत्यांचे अभिनंदन करा. आपल्याकडे पुढे अनेक संधी आहेत त्या संधीचं सोनं करा, आपण कुठे कमी पडलो हे जजेसना विनम्रपणे विचारा, जेणेकरून आपण त्या पैलूंवर आणखी सुधारणा करू शकाल आणि पुढील संधीचा आनंद घ्या.

- अंजना मस्करेन्हास -

संस्थापक आणि दिग्दर्शक, दिवा पेजंट्स

Web Title: To win a beauty contest ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.