वाईन शॉप नियमात बंद : बारला वेळेचे बंधन नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:10 AM2021-01-23T04:10:21+5:302021-01-23T04:10:21+5:30

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, अनेक दुकाने, रेस्टॉरंट अँड बार या सर्वांवर वेळेचं बंधन घातले. महाराष्ट्रात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. ...

Wine shop rules closed: Bar has no time limit | वाईन शॉप नियमात बंद : बारला वेळेचे बंधन नाही

वाईन शॉप नियमात बंद : बारला वेळेचे बंधन नाही

googlenewsNext

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हॉटेल, अनेक दुकाने, रेस्टॉरंट अँड बार या सर्वांवर वेळेचं बंधन घातले. महाराष्ट्रात अजूनही कोरोनाचे रुग्ण सापडत आहे. त्यामुळे राज्यात ३० जानेवारीपर्यंत संचारबंदी वाढवली आहे. त्यामध्ये नियमात काही बदल केलेला नाही. अगोदरच्या नियमाप्रमाणे पालन करावे. असे राज्यशासनाने सांगितले आहे.

डिसेंबर महिन्यात २५ तारखेनंतर नियम कडक केले होते. नवीन वर्षाच्या ४ जानेवारीपासून त्यामध्ये शिथिलता आणली. तरीही रेस्टॉरंट आणि बार रात्री ११ नंतर बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बार आणि परमिट रूमबाबत नियमांचे पालन होत नाही.

चौकट

बार - १७४९

वाईन शॉप - २८३

चौकट

पुणे शहरात मध्यवर्ती भागात ९.३० वाजता वाईन शॉप बंद होतात. तर काही शॉप १० वाजेपर्यंत उघडे असतात. त्यांच्याकडून नियमांचे पालन होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

चौकट

शहरात बारच्या बाबतीत कुठल्याच प्रकारचे नियम पाळले जात नाहीत. कर्वे रस्ता, फर्ग्युसन रस्ता, सातारा रस्ता, याबरोबरच खंडूजीबाबा चौक, पेठांमधील काही बार रात्री १२-१ पर्यंत उघडे असतात. उपनगरातही हीच परिस्थिती असल्याचे निदर्शनास आले आहे.

चौकट

नगर रस्त्यावर वाईन शॉप १०.३० पर्यंत उघडे असल्याचे निदर्शनास आले आहे. काही दुकानदार बंद केल्यावर देखील विक्री करताना आढळून आले आहेत.

चौकट

रेस्टॉरंट अँड बार वेळेचे बंधन असतानाही वीज बंद करून ग्राहकांच्या विनंतीवरून आत प्रवेश दिला जातो. यावरून नियमांचे पालन होत नसल्याचे दिसून आले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश काय

१) रेस्टॉरंट आणि बार यांना रात्री ११ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

२) वाईन शॉपला रात्री १० वाजेपर्यंत परवानगी देण्यात आली आहे.

३) बारमध्ये येणाऱ्या ग्राहकांवर ५० टक्के मर्यादा घातली आहे.

कोट

रेस्टॉरंट आणि बार खुले ठेवण्यासाठी नियमाने रात्री दीड वाजेपर्यंत वेळ आहे. कोविडमुळे नियमामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाकडून वेळेची बंधन घातले आहे. त्यामुळे काही चालकांमध्ये अजूनही गैरसमज आहेत. जिथे गर्दीचे उल्लंधन होत नाही. त्याठिकाणी अडचण निर्माण होत नाही. मात्र नियमांचे उल्लंघन केले जात असेल. तर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाई केली जाईल.

- संतोष सुर्वे, विभागीय उपअधीक्षक, उत्पादन शुल्क

Web Title: Wine shop rules closed: Bar has no time limit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.