हिवाळा की पावसाळा पुणेकर संभ्रमात ; तिसऱ्या दिवशीही शहरात पावसाची हजेरी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2018 08:47 PM2018-11-06T20:47:29+5:302018-11-06T20:49:15+5:30
अाज दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. साधारण अर्धा तास पावसाने शहरात हजेरी लावली.
पुणे : सलग तिसऱ्या दिवशीही पुण्यात पावसाने हजेरी लावल्याने स्वेटर एेवजी रेणकाेट साेबत ठेवण्याची वेळ पुणेकरांवर येत अाहे. अाज दुपारी पुन्हा पावसाने हजेरी लावल्याने पुणेकरांची चांगलीच तारांबळ उडाली. साधारण अर्धा तास पावसाने शहरात हजेरी लावली.
रविवारी रात्री पावसाने शहरातील काही भागात हजेरी लावली हाेती. साेमवारी दुपारी 12 च्या सुमारास अचानक ढग भरुन अाले अाणि शहारीतल अनेक भागात पावसाच्या जाेरदार सरी काेसळल्या. अाजही सारखीच परीस्थिती निर्माण झाली. दुपारच्या सुमारास पावसाने शहरातील मध्यवर्ती भागात हजेरी लावली. अर्धा तास पडलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर पाणी साचले हाेते. काहींनी पावसापासून संरक्षणासाठी दुकानांच अाधार घेतला तर साेमवारच्या अनुभवामुळे अनेकांनी रेणकाेट अापल्या साेबत ठेवला हाेता. अचानक अालेल्या पावसामुळे दिवाळीसाठी खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची चांगलीच निराशा झाली. झेंडूच्या फुलांची विक्री करणाऱ्यांची फुले या पावासात भिजल्याने अनेकांच्या मालाचे नुकसान झाले. मुलांनी शहारातील काही चाैकांमध्ये तयार केलेल्या मातीच्या किल्ल्यांनाही या पावसाचा फटका बसला. अनेक किल्ल्यांचा चिखल झाल्याने लहानग्यांची चांगलीच निराशा झाली.
तामिळनाडूमध्ये सध्या जाेरदार पाऊस सुरु अाहे. अाज शहरात ढगाळ हवामान राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला हाेता. सतत तीन दिवस पाऊस पडत असल्याने दिवाळीच्या खरेदीसाठी बाहेर पडलेल्यांची मात्र चांगलीच निराशा झाली.