भोरच्या दुर्गम भागातील संपर्कासाठी बिनतारी संदेश यंत्रणा कार्यन्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:11 AM2021-07-27T04:11:27+5:302021-07-27T04:11:27+5:30
भोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत वारवंड, धानवली, कोंढरी, परहर सांळूगण, कंकवाडी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे, घाट माथ्यावरील दरडी कोसळून भुस्खलन झालेने ...
भोर पोलिस स्टेशनच्या हद्दीत वारवंड, धानवली, कोंढरी, परहर सांळूगण, कंकवाडी या गावामध्ये अतिवृष्टीमुळे, घाट माथ्यावरील दरडी कोसळून भुस्खलन झालेने रस्ता खचणे रस्त्यावर आणि पुलावर पाणी येणे इत्यादी कारणामुळे भोर महाड या मुख्य रस्ताला जोडणारा रस्ता बंद झाला असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गावच्या सुरक्षेच्या दृष्टी कोणातून गावातील लोकांना संपर्क करणेसाठी भोर पोलिस स्टेशनच्या माध्यमातून पोलिस पाटील यांना बिनतारी संदेश यंञनेचे प्रशिक्षण देण्यात आले.बिनतारी संदेश यंञणेमुळे काही अघटीत घटना घडून आल्यास मदतीसाठी तसेच प्रतिबंधक उपाय म्हणून या यंञनेचा व साधनांचा उपयोग होणार असल्याचे पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांनी सांगितले.
पोलिस निरीक्षक प्रविण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट अंमलदार अशोक खुटवड, उध्दव गायकवाड, अमोल मु-हे, राजकुमार भिसे यांनी पोलिस पाटील सुधीर दिघे, शंकर पारठे, बापू हुंबे, प्रतिभा सांळुखे, महापती दानवले यांना प्रशिक्षण देण्यात आले.
--
फोटो क्रमांक: २६ भोर बनितारी यंत्रणा
फोटो ओळी : भोर पोलिस स्टेशनच्या वतीने बिनतारी संदेश यंत्रणेचे प्रशिक्षण देताना पोलिस कर्मचारी