महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 09:29 PM2022-10-13T21:29:24+5:302022-10-13T21:29:40+5:30

फेसबुकवरील तक्रारीची महिला व बालविकास विभागाने घेतली तात्काळ दखल

With the prompt help of the Women and Child Development Department a disabled girl got permanent shelter | महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

महिला व बालविकास विभागाच्या तत्पर मदतीने दिव्यांग मुलीला मिळाला कायमस्वरूपी निवारा

googlenewsNext

पुणे : पुण्यातील सजग नागरिक राहुल जाधव यांनी एक वीस वर्षीय दिव्यांग रस्त्यावर राहत असून, तिच्या आईचे 3 महिन्यापूर्वी निधन झाले आहे. तिचा सांभाळ करणारे कोणीही नाही असा मेसेज राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर केला. त्यात तिला सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार असून त्यांनी त्याकामी शासकीय यंत्रणेच्या सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. या मेसेजची तत्काळ दखल घेत  अवघ्या सहा तासात महिला व बालविकास विभागाने दिव्यांग मुलीला कायमस्वरुपी आसरा मिळवून दिला. 

12 आॅक्टोबर 2022 रोजी संध्याकाळी 7 च्या सुमारास राहुल जाधव यांनी राज्य शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेज वर मेसेज करून याबाबत एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक रुबल अग्रवाल यांना माहिती दिली.  त्यावर त्यांनी तातडीने ही माहिती पुणे महिला व बाल विकास आयुक्त आर.विमला यांना देत त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. या प्रकरणात तत्काळ कार्यवाही करत विमला यांनी त्या मुलीला मुंढवा येथील महिला वसतिगृहात दाखल करत तिच्या राहण्याची व्यवस्था केली.

''मी महिला व बाल विकास विभागाच्या फेसबुक पेजवर संबंधित मुलीबाबत माहिती दिली असता मला विभागाकडून तत्काळ प्रतिसाद मिळाला. विशेषत: काही तासांमध्ये विभागाने या दिव्यांग मुलीच्या कायमस्वरूपी निवासाची व्यवस्था केली. शासकीय विभागाकडून इतक्या लवकर आणि सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. महिला व बालविकास विभागाच्या सोशल मीडिया टीम आणि सर्व अधिकारी - कर्मचारी यांचे मन:पूर्वक आभार मानतो- राहुल जाधव,  पुणे.''

''एक महिला अधिकारी म्हणून या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ या प्रकरणात वैयक्तिक लक्ष घालून हा विषय संवेदनशीलतेने हाताळत मार्गी लावून त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधितांना दिले. अवघ्या 6 तासात कागदोपत्री कारवाई पूर्ण करत आम्ही त्या मुलीला शासकीय संस्थेत दाखल केले याचा मला आनंद आहे- रुबल अग्रवाल, एकात्मिक बाल विकास आयुक्त तथा महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक''

Web Title: With the prompt help of the Women and Child Development Department a disabled girl got permanent shelter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.