गुन्हे तत्काळ मागे घ्या, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 04:08 AM2021-06-27T04:08:02+5:302021-06-27T04:08:02+5:30

उद्योगपती अशोक जिंदाल याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाबत अपशब्द वापरलेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली होती. याबाबत ...

Withdraw the crime immediately, otherwise agitation | गुन्हे तत्काळ मागे घ्या, अन्यथा आंदोलन

गुन्हे तत्काळ मागे घ्या, अन्यथा आंदोलन

Next

उद्योगपती अशोक जिंदाल याने छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या बाबत अपशब्द वापरलेची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झालेली होती. याबाबत काही तरुणांनी संबंधित अशोक जिंदाल यास जाब विचारला होता. या प्रकरणी इंदापूर पोलिसांनी उद्योपतीच्या सांगण्यावरून सत्यता न तपासता एकाच घटनेचे दोन गुन्हे दाखल केले. एका गुन्ह्याप्रकरणी मा. न्यायालयाने जामीन दिलेला असतानाही पोलिसांद्वारे बेकायदेशीरपणे डांबून ठेवण्यात आले, असे निवेदनात म्हटले आहे.

याप्रकरणी सदर उद्योगपतीवर गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता असताना तरुणांच्यावर गुन्हा दाखल होणे योग्य नाही. हे गुन्हे तत्काळ मागे घ्या अन्यथा आंदोलनाचा मार्ग निवडावा लागेल, अशा इशारा यावेळी बोलताना अ‍ॅड. पांडुरंग जगताप यांनी दिला.

भिगवण पोलिसांच्या वतीने जीवन माने यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी मराठा महासंघाचे तालुकाध्यक्ष राजकुमार मस्कर, छत्रपती वाचनालयाचे अध्यक्ष अ‍ॅड. पांडुरंग जगताप, माजी सरपंच पराग जाधव, दीनानाथ मारणे, तुषार चव्हाण, अमितकुमार वाघ, अ‍ॅड. कन्हय्या पहाणे, विशाल धुमाळ, हर्षवर्धन ढवळे तसेच मदनवाडी तक्रारवाडी भिगवण रेल्वे स्टेशन डिकसळ येथील मराठा बांधव उपस्थित होते.

Web Title: Withdraw the crime immediately, otherwise agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.