पुण्यात अखेर सत्ताधारी भाजपची माघार; महापालिकेच्या 'अ‍ॅमेनिटी स्पेस' भाडेतत्वावर देणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2021 09:20 PM2021-09-21T21:20:34+5:302021-09-21T21:20:49+5:30

भाडेतत्वावर देण्याबाबतच्या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तिव्र विरोध केला

The withdrawal of the ruling BJP in Pune; Municipal Corporation's 'Amnesty Space' will not be rented out | पुण्यात अखेर सत्ताधारी भाजपची माघार; महापालिकेच्या 'अ‍ॅमेनिटी स्पेस' भाडेतत्वावर देणार नाही

पुण्यात अखेर सत्ताधारी भाजपची माघार; महापालिकेच्या 'अ‍ॅमेनिटी स्पेस' भाडेतत्वावर देणार नाही

googlenewsNext
ठळक मुद्देअ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थगित करणे हा पुणेकरांचा विजय

पुणे : पुणे शहरातील महापालिकेच्या ताब्यातील अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याबाबत अखेर सत्ताधारी भाजपने माघार घेतली. या निर्णयास विरोधी पक्षांसह सामाजिक संघटनांनी तिव्र विरोध केल्यानंतर बुधवारी मुख्यसभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी न आणण्याचा निर्णय आता भाजपने घेतला आहे. याबाबत घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांसह, सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय आम्ही घेणार असल्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले. 

महापौर मुरलीधर मोहोळ आणि स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी याबाबत पत्रकार परिषदेत भाजपची भुमिका स्पष्ट केली. यावेळी महापौर म्हणाले, या सर्व अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देऊन त्यामाध्यमातून जवळपास 1 हजार 700 कोटींचे उत्पन्न महापालिकेला मिळणार आहे. या निधीतून अनेक महत्वाचे प्रकल्प मार्गी लागू शकणार आहे. मात्र, राष्ट्रवादीसह सर्वच विरोधी पक्षांनी जाणीवपुर्वक अ‍ॅमेनिटी स्पेस विकायला काढल्या आहेत असे आरोप करून पुणेकरांमध्ये गैरसमज निर्माण केला.

एकीकडे एमएमआरडीए, पीएमआरडीए, सिडको याठिकाणी असलेल्या राष्ट्रवादी व शिवसेनेच्या ताब्यामधील संस्थामध्ये अशा पध्दतीचा निर्णय घेतला आहे. पुण्यात मात्र भाजपची सत्ता असल्याने चुकीचे आरोप करून गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे घाईघाईने कोणताही निर्णय न घेता पुणेकरांसह, सामाजिक संस्था, नागरिक सर्वांना एकत्र विश्वासात घेऊन आम्ही अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर न देण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत. बुधवारी मुख्यसभेत यासंबधीचा प्रस्ताव मंजुर करणार नसल्याचे महापौरांनी जाहीर केले. तसेच अ‍ॅमेनिटी भाडे तत्वावर देण्यास आम्ही ठाम असल्याचेही महापौर यांनी यावेळी स्पष्ट केले.

निर्णय स्थगित हा पुणेकरांचा विजय

''अ‍ॅमेनिटी स्पेस भाड्याने देण्याचा निर्णय स्थगित करणे हा पुणेकरांचा विजय आहे. महापालिकेची मालकी असलेल्या आणि पुणेकरांच्या हक्काच्या जमिनी धनदांडग्यांच्या घशात घालण्याच्या भाजपच्या प्रयत्नाला लगावलेली जोरदार चपराक आहे. विघ्नहर्ता गजाननाने भाजपला उशिरा का होईना सद्बुद्धी दिली असून, त्यामुळे पुणेकरांवर भाजपमुळे येऊ घातलेले एक विघ्न टळले असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.''

Web Title: The withdrawal of the ruling BJP in Pune; Municipal Corporation's 'Amnesty Space' will not be rented out

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.