तातडीच्या कामाशिवाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:10 AM2021-04-02T04:10:21+5:302021-04-02T04:10:21+5:30
बारामती नगरपरिषदेकडून नवीन नियमावली जाहीर बारामती नगर परिषदेकडून नवीन नियमावली जाहीर बारामती: वाढत्या कोरोना रुग्ण पार्श्वभूमीवर बारामती नगर ...
बारामती नगरपरिषदेकडून
नवीन नियमावली जाहीर
बारामती नगर परिषदेकडून नवीन नियमावली जाहीर
बारामती: वाढत्या कोरोना रुग्ण पार्श्वभूमीवर बारामती नगर परिषदेच्या वतीने दैनंदिन कामकाजासाठी नगर परिषद कार्यालयात येणाऱ्या नागरिकांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी वगळता तातडीच्या कामाशिवाय नगर परिषद कार्यालयात नागरिकांनी ३० एप्रिलपर्यंत येऊ नये, असे आदेश नगर परिषद प्रशासानाच्या वतीने काढण्यात आले आहेत.
महाराष्ट्र शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभागाद्वारे २७ मार्च २०२१ रोजी शासकीय कार्यालयात गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी अंमलबजावणी करावयाच्या कोविड-१९ विषयक उपाययोजना अनुसरून ही नियमावली जाहीर करण्यात आली आहे. कार्यालयामध्ये गर्दी कमी करण्यासाठी लोकप्रतिनिधी वगळून इतर नागरिकांना तातडीच्या कामाशिवाय नगर परिषद कार्यालयात प्रवेश करण्यास परवानगी मिळणार नाही. तसेच ज्या नागरिकांना बैठकीसाठी बोलविण्यात आले आहे त्यांच्याबाबतीत विभाग प्रमुख प्रवेशपत्र देतील. नागरिकांना नगर परिषदेकडील जन्म मृत्यू दाखले व इतर परवानगी प्रमाणपत्र इत्यादी तयार झाल्याचे संबंधित विभागाकडून कळविल्यानंतरच कार्यालयात यावे. अत्यंत तातडीचे टपाल, संदेश हे ई-मेलद्वारे पाठविण्यात येतील.
नागरिकांची पत्रे तसेच मुख्यालयातील दैनंदिन टपाल व इतर महत्त्वाची पत्रे स्वीकारण्यासाठी तळमजल्यावरच टपाल कक्ष उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. तरी नागरिकांनी तक्रार अथवा निवेदन तळमजल्यावरील टपाल कक्षातच दाखल करावे. केवळ अत्यंत तातडीची प्रत्यक्ष कार्यालयीन काम आणि कोविड-१९ संबंधित बाबीकरिता विभाग प्रमुख यांच्यामार्फत विहित नमुन्यातील प्रवेश पत्र संबंधित नागरिकांना टपाल कक्षात उपलब्ध करून देण्यात येईल. कार्यालयात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. तसेच थर्मल गनद्वारे शरीराचे तापमानाची नोंद देखील घेतली जाईल. लक्षणे आढळून येणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक आहे.
कार्यालयात येणाऱ्या प्रत्येकाने प्रवेशद्वाराजवळील नोंदवहीमध्ये स्वत:च्या नावाची व मोबाईल नंबरची नोंद करावी. तसेच सर्व नागरिकांनी सुरक्षारक्षकांस सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी नगर परिषदेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.