गणेशमूर्ती विक्री दुकानातून रोकड चोरणाऱ्या महिलेला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:09 AM2021-09-13T04:09:35+5:302021-09-13T04:09:35+5:30

पुणे : गणपती मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानातून नजर चुकवून ५० हजारांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी ...

Woman arrested for stealing cash from Ganeshmurti shop | गणेशमूर्ती विक्री दुकानातून रोकड चोरणाऱ्या महिलेला अटक

गणेशमूर्ती विक्री दुकानातून रोकड चोरणाऱ्या महिलेला अटक

Next

पुणे : गणपती मूर्ती विक्री करणाऱ्या दुकानातून नजर चुकवून ५० हजारांची रोकड लांबविण्यात आल्याची घटना येरवडा भागात घडली. याप्रकरणी एका ६० वर्षाच्या महिलेला अटक करण्यात आली.

रंजना सुरेश साळुंखे (वय ६०, रा. सांगोला, सोलापूर) असे अटक केलेल्या महिलेचे नाव असून तिच्याबरोबर असलेल्या दोन महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका ३३ वर्षांच्या महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेचा गणेशमूर्ती विक्री व्यवसाय आहे. येरवडा गाडीतळ परिसरात महिलेने मूर्ती विक्रीचा स्टॉल टाकला होता. शुक्रवारी (१० सप्टेंबर) दुपारी साडेतीनच्या सुमारास मूर्ती खरेदीच्या बहाण्याने तीन महिला स्टॉलजवळ आल्या. रंजना साळुंखे आणि तिच्यासोबत आलेल्या दोन महिलांनी गणपती विकत घेण्याचा बहाण्याने स्टॉलवरील दोघांना बोलण्यात गुंतवून ठेवले तसेच दिवसभरात व्यवसायात जमा झालेली स्टॉलवरील ५० हजारांची रोख रक्कम चोरी करून नेल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

अटक केलेल्या महिलेला न्यायालयात हजर करण्यात आले. आरोपी ही उडवाउडवीचे उत्तरे देत आहे. झडतीमध्ये ५ हजारांची रक्कम मिळून आली आहे. गुन्ह्यात चोरलेली रक्कम जप्त करणे तसेच इतर दोन महिलांना अटक करणे, आणखी गुन्हे केले आहेत. त्यांचे इतर साथीदार आहेत का? या तपासासाठी ३ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. न्यायालयाने ती मान्य केली.

Web Title: Woman arrested for stealing cash from Ganeshmurti shop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.