अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी महिलेला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:11 AM2021-03-31T04:11:55+5:302021-03-31T04:11:55+5:30
पुणे : चौदा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका महिलेला अटक केली. न्यायालयाने तिला ...
पुणे : चौदा वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेण्यास मदत केल्याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी एका महिलेला अटक केली. न्यायालयाने तिला दोन दिवस पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश दिला आहे.
स्वरूपा शेलार (वय २६) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी आणखी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अल्पवयीन पीडित मुलीच्या वडिलांनी फिर्याद दिली आहे. २ मार्च रोजी ही घटना घडली.
फिर्यादींच्या अल्पवयीन पीडित मुलीला आरोपींनी फूस लावून पळवून नेले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी शेलार हिला न्यायालयात हजर केले असता, तिने या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला पीडित मुलीला पळवून नेण्यात मदत केली आहे. तिने या गुन्ह्यातील मुख्य आरोपीकडे ५० हजार रुपयांची मागणी केली आहे. त्याबाबत तिच्याकडे तपास करायचा आहे. यासह गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.