जोडप्यास मदत करणाऱ्या महिलेला मारहाण

By admin | Published: November 7, 2016 01:26 AM2016-11-07T01:26:00+5:302016-11-07T01:26:00+5:30

एका जोडप्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या महिलेसच मारहाण करून डोळ्यांवर कापड बांधून बळजबरीने पळवून नेण्यात आल्याची घटना राजगुरुनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात शुक्रवारी घडली

A woman assaulting a couple assaulted | जोडप्यास मदत करणाऱ्या महिलेला मारहाण

जोडप्यास मदत करणाऱ्या महिलेला मारहाण

Next

राजगुरुनगर : एका जोडप्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या महिलेसच मारहाण करून डोळ्यांवर कापड बांधून बळजबरीने पळवून नेण्यात आल्याची घटना राजगुरुनगर शहरातील कुंभारवाडा परिसरात शुक्रवारी घडली.
याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताराबाई हिराजी शिंगोले यांना बेदम मारहाण करून घरातून डोळ्याला कापड बांधून पळवून नेल्याच्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी ज्ञानेश्वर महादू डांगले, भीमाबाई ज्ञानेश्वर डांगले, अंकुश सखाराम करंडे, सोमनाथ सखाराम करंडे, राजश्री अंकुश करंडे, जया शैलेश गुंजाळ ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यापैकी ज्ञानेश्वर महादू डांगले, भीमाबाई ज्ञानेश्वर डांगले यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्याने भाजपाच्या तालुका महिला अध्यक्षा सुप्रिया मुळुक, पल्लवी नाईक, मोहिनी राक्षे या महिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन याबाबत पोलिसांना जाब विचारला. त्यानंतर संबंधित आरोपींवर शुक्रवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला. राजगुरुनगर येथे राहणाऱ्या ताराबाई हिराजी शिंगोले यांच्या घरी जाऊन वरील आरोपींनी, आमची मुलगी तुम्ही पळवून नेली असून तिने सोबत आणलेले दागिने कोठे ठेवले आहेत, कपाटाची चावी दे, म्हणत मारहाण केली. त्यानंतर शिंगोले यांना दुचाकीवर बसवून तिन्हेवाडी रोड येथे आरोपींच्या घरी आणण्यात आले. तेथेही या महिलेस शिवीगाळ करीत मारहाण केली.
त्यानंतर ताराबाईच्या डोळ्यांवर कापड बांधून बळजबरीने मोटारीत बसवून पळवले. महिलेच्या भाच्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक डी. एस. महाडिक, टी. एस. हगवणे करीत आहेत. पळवून नेलेल्या महिलेची सुटका करण्यात आली आहे. तसेच, पळून गेलेली मुलगी आई वडिलांकडे गेल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: A woman assaulting a couple assaulted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.