खराबवाडीत महिलेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:15 AM2021-09-12T04:15:09+5:302021-09-12T04:15:09+5:30
चाकण : मला तुझ्याशी काही बोलायचे आहे, असा बहाणा करून महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचा ...
चाकण : मला तुझ्याशी काही बोलायचे आहे, असा बहाणा करून महिलेच्या असाह्यतेचा फायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. चाकण एमआयडीसीतील खराबवाडी, वाघजाईनगर येथे गुरुवारी (दि. ९) हा घृणास्पद प्रकार घडला होता. चाकण पोलिसांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) आरोपीला अटक केली.
मोहमद इस्तियाक उर्फ छोटू मोहमद हनीफ फकीर (वय १९, सध्या रा. अशोक इंडस्ट्रीज कंपनीची खोली, चाकण, मूळ रा. कानपूर, उत्तर प्रदेश,) असे अटक करण्यात आलेल्या परप्रांतीय नराधमाचे नाव आहे. पीडित महिला व मोहमद हे एकमेकांना ओळखत होते. त्यामुळे मोहमद याने पीडितेच्या असहाय्यतेचा फायदा घेत तिला १९ ऑगस्ट रोजी रात्री १०.३० च्या दरम्यान तुझ्याशी मला काही बोलायचे आहे, असा बहाणा करून तिला बोलावून घेतले. त्यानंतर जबरदस्तीने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बलात्कार केला. पीडितेच्या फिर्यादी वरून मोहमद याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.