जादा परताव्याच्या आमिषाने महिलेची २७ लाखांची फसवणूक, पिंपरीतील घटना
By नारायण बडगुजर | Published: April 5, 2024 08:49 AM2024-04-05T08:49:51+5:302024-04-05T08:50:07+5:30
पिंपरी येथे १४ डिसेंबर २०२३ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला....
पिंपरी : जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून महिलेला गुंतवणूक करण्यास भाग पाडले. मात्र, कोणताही परतावा न देता तिची २७ लाख रुपयांची फसवणूक केली. पिंपरी येथे १४ डिसेंबर २०२३ ते ३ मार्च २०२४ या कालावधीत हा प्रकार घडला.
याप्रकरणी महिलेने बुधवारी (दि. ३) पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. मर्लिना, शाम कपूर व विविध बँक खातेधारक तसेच व्हाटस ग्रुपधारक यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेला संशयितांनी एका व्हॉटसअप ग्रुपमध्ये दाखल केले.
तेथे त्यांना गुंतवणुकीबद्दल सांगितले. गुंतवूणक केल्यास जास्त परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर फिर्यादी महिलेला २७ लाख ३२ हजार २० रुपये भरायला सांगितले. मात्र, त्यांना कोणताही परतावा न देता संशयितांनी फसवणूक केली.