नोकरी मिळविण्यासाठी महिलेने केली CID ची केली फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 06:24 PM2022-03-12T18:24:27+5:302022-03-12T18:27:28+5:30

चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

woman cheated the cid to get the job in police department pune crime news | नोकरी मिळविण्यासाठी महिलेने केली CID ची केली फसवणूक

नोकरी मिळविण्यासाठी महिलेने केली CID ची केली फसवणूक

googlenewsNext

पुणे : पोलीस उपनिरीक्षक याच्या मृत्युनंतर त्याच्या जागी अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी त्याच्या पत्नीने बनावट मार्कलिस्ट व प्रमाणपत्र तयार करुन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चैताली ऊर्फ चैत्राली रवींद्र खुळे (रा. वाशिम) यांच्याविरुद्ध चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, पोलीस उपनिरीक्षक रवींद्र खुळे हे अंगुलीमुद्रा या पदावर वाशिम येथे सीआयडीच्या कार्यालयात कार्यरत होते. त्यांचे कर्करोगाने २२ सप्टेंबर २०१७ रोजी निधन झाले. त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्वावर नोकरी मिळविण्यासाठी त्यांची पत्नी चैत्राली खुडे यांनी २६ ऑक्टोबर २०१७ रोजी सहायक शासकीय दस्तऐवज परिक्षक किंवा लिपिक या पदावर नोकरी मिळविण्यासाठी विनंती अर्ज केला.

त्यासाठी त्यांनी यशवंतराव मुक्त विद्यापीठ यांचेकडील बी. ए. तृतीय वर्षाचे मार्कलिस्ट व प्रमाणपत्र खोटे व बनावट बनवून ते राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालक कार्यालयात सादर करुन फसवणूक केली. सहायक पोलीस निरीक्षक पवार तपास करीत आहेत.

Web Title: woman cheated the cid to get the job in police department pune crime news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.