सासरच्यांना कंटाळून महिलेची विहिरीत उडी मारून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:11 AM2021-05-25T04:11:44+5:302021-05-25T04:11:44+5:30
पुणे : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. दि. २० मे ला वाडेबोल्हाईतील शिंदे वस्तीवर ही ...
पुणे : सासरच्या छळाला कंटाळून महिलेने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली.
दि. २० मे ला वाडेबोल्हाईतील शिंदे वस्तीवर ही घटना घडली. याप्रकरणी महिलेचा पती आणि सासू सासऱ्यांविरूद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलम धोंडिबा शिंदे (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. नवरा धोडिंबा भाउसो शिंदे, सासू हिराबाई भाउसो शिंदे आणि सासरा भाउसो बापू शिंदे (सर्व रा. वाडेबोल्हाई, हवेली) यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर भालेराव यांनी तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलम आणि धोंडिबा यांचे लग्न झाल्यापासून तिचा सासरचे लोक छळ करीत होते. वेळोवेळी प्रापंचिक कारणाने तसेच संशयी वृत्तीने मारहाण करून नीलमला त्रास देत होते. त्यामुळे छळास कंटाळून नीलमने २० मे ला सकाळी ९ च्या सुमारास विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती आणि सासू-सासऱ्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करीत आहेत.