पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेची गळफास घेत आत्महत्या; कोथरुडमधील तिसरी घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2020 01:10 AM2020-08-02T01:10:30+5:302020-08-02T01:10:48+5:30

तीन वर्षांपूर्वी झाला होता विवाह..

Woman commits suicide by strangulation in Pune ,The third incident in Kothrud | पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेची गळफास घेत आत्महत्या; कोथरुडमधील तिसरी घटना

पुण्यात कौटुंबिक वादातून महिलेची गळफास घेत आत्महत्या; कोथरुडमधील तिसरी घटना

googlenewsNext
ठळक मुद्देअलंकार पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

पुणे : कौटुंबिक वादातून एका महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरुडमध्ये घडली. 
भाग्यश्री अमेय पाटील (वय ३०, रा. पश्चिमानगर, कोथरुड) असे या महिलेचे नाव आहे. भाग्यश्री वास्तुविशारद होत्या. त्यांचे पती अमेय संगणक अभियंता आहेत. त्यांचा ३ वर्षांपूर्वी विवाह झाला होता.लॉकडाऊनच्या काळात दोघेही घरीच होते.दोघांमध्ये बुधवारी किरकोळ कारणावरुन वाद झाला.त्यानंतर भाग्यश्री खोलीत निघून गेल्या. त्यांनी खोलीचा दरवाजता आतून बंद केला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळीही भाग्यश्री यांनी दरवाजा उघडला नाही. अमेय यांनी दरवाजा वाजविला तरी त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तेव्हा त्यांनी इतरांच्या मदतीने दरवाजा उघडल्यावर भाग्यश्री यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.
अलंकार पोलीस ठाण्यात एका आठवड्याच्या आत आत्महत्येच्या तीन घटनांमध्ये ४ जणांचा मृत्यु झाला आहे.अगोदर गोरे दाम्पत्यांनी आत्महत्या केली होती. त्यानंतर डहाणुकर कॉलनीतील वरदा माडगुळकर यांनी नवव्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली होती.

Web Title: Woman commits suicide by strangulation in Pune ,The third incident in Kothrud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.