दुर्दैवी! ४ वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2021 03:45 PM2021-08-13T15:45:46+5:302021-08-13T16:19:14+5:30

दरम्यान महिलेच्या पतीचाही आत्महत्येचा प्रयत्न

A woman committed suicide by jumping into a well with her child in Karandi of Shirur taluka | दुर्दैवी! ४ वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

दुर्दैवी! ४ वर्षाच्या मुलासह महिलेने विहिरीत उडी मारून संपवलं जीवन; शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना

googlenewsNext
ठळक मुद्देमहिला काही कारणाने तणावात होती

 केंदुर : शिरूर तालुक्याच्या करंदी येथे एका महिलेने आपल्या साडेचार वर्षाच्या मुलासह घरा जवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. तर या घटनेनंतर महिलेच्या पतीनेही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  मोनिका भगवान चंद्रावळे  (वय ३०) व साई उर्फ ऋषी भगवान चंद्रावळे (वय ४ ) अशी त्यांची नावे असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे नोंद करण्यात आली आहे.
           
 मोनिका चंद्रावळे या काही तणावात होत्या. सकाळच्या सुमारास त्या तिच्या मुलाला घेऊन कोठेतरी गेल्या. त्यांनतर दुपारच्या वेळेस शेजारील काही नागरिक शेतात काम करत असताना त्यांना विहिरीमध्ये मोनिका व ऋषी यांच्या चपला तरंगत असल्याचे आढळून आले.

त्यावेळी दोघा माय - लेकांनी आत्महत्या केली असल्याचा अंदाज वर्तविला गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान काही नागरिकांनी लोखंडी गळ व दोरीच्या सहाय्याने विहिरीमधील मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी मोनिका आणि साई यांचे मृतदेह मिळून आले.

यावेळी मोनिका चा पती भगवान चंद्रावळे यांनी देखील आत्महत्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती मिळाली असल्याचे शिक्रापूर पोलिसांनी सांगितले. भगवान यांच्यावर पुणे येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती स्थिर आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहे.

Web Title: A woman committed suicide by jumping into a well with her child in Karandi of Shirur taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.