बारामतीत महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू; दहा दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2022 09:48 AM2022-09-20T09:48:23+5:302022-09-20T09:51:37+5:30

च्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बालकं पोरकं झाले आहे...

Woman cop dies of dengue in Baramati; The baby was born ten days ago | बारामतीत महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू; दहा दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

बारामतीत महिला पोलिसाचा डेंग्यूने मृत्यू; दहा दिवसांपूर्वी दिला होता बाळाला जन्म

googlenewsNext

बारामती : बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे, असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधनानं अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले बालकं पोरकं झाले आहे.

शीतल या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. प्रसूतीनंतर त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचारासाठी त्यांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना आज पहाटे त्यांचे निधन झाले.
शितल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या.

प्रसुतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे, मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या. पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी आज सकाळी दहा वाजता पणदरे इथं करण्यात येणार आहे.

Web Title: Woman cop dies of dengue in Baramati; The baby was born ten days ago

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.