बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:12 AM2021-07-27T04:12:35+5:302021-07-27T04:12:35+5:30

पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करत असताना चालकाला बस थांबविण्यास सांगून उतरण्यासाठी महिला दरवाजाजवळ गेली असताना दरवाजा उघडा ठेवल्याने ...

Woman dies after falling from bus door | बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू

बसच्या दरवाजातून पडून महिलेचा मृत्यू

Next

पुणे : पीएमपी बसमधून प्रवास करत असताना चालकाला बस थांबविण्यास सांगून उतरण्यासाठी महिला दरवाजाजवळ गेली असताना दरवाजा उघडा ठेवल्याने त्यातून पडून महिलेचा मृत्यू झाला.

महादेवी गोरख गायकवाड (वय २३, रा. पवार मळा, वडकीनाला) असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी बसचालक प्रविण शिवाजी कड (वय ४४, रा. नायगांव, ता. पुरंदर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना वडकी गावाच्या हद्दीत धनलक्ष्मी वजन काट्याजवळ २९ मार्च २०२१ रोजी घडली होती. पोलिसांनी अकस्मात मृत्यु अशी नोंद केली होती. त्याचा तपास करताना हा प्रकार उघड झाला. महादेवी गायकवाड या बसमधून प्रवास करीत होत्या. त्यांनी चालकाला बस थांबविण्यास सांगितले व त्या दरवाज्याजवळ गेल्या. मात्र, बसचालकाने बस तशीच पुढे घेऊन गेला. बसचा दरवाजा उघडा ठेवल्याने गायकवाड या बसमधून खाली पडून त्यांचा मृत्यु झाला.

Web Title: Woman dies after falling from bus door

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.