Pune Crime: सराफी पेढीच्या मालकाकडून कर्मचारी महिलेचा विनयभंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 21:14 IST2023-10-17T21:14:00+5:302023-10-17T21:14:57+5:30
पुणे : हडपसर भागातील एका सराफी पेढीच्या मालकाने कर्मचारी महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी सराफी पेढीचे मालक विनोद रमेश कुलकर्णी ...

Pune Crime: सराफी पेढीच्या मालकाकडून कर्मचारी महिलेचा विनयभंग
पुणे : हडपसर भागातील एका सराफी पेढीच्या मालकाने कर्मचारी महिलेचा विनयभंग केला. याप्रकरणी सराफी पेढीचे मालक विनोद रमेश कुलकर्णी (वय ३६, रा. लोणी काळभोर) याच्या विरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
अधिक माहितीनुसार, हडपसर भागातील कामधेनू इस्टेट परिसरात सराफी पेढी आहे. त्याचा मालक कुलकर्णी याने महिलेशी अश्लील कृत्य केले. महिलेने त्याला विरोध केला. तिने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर कुलकर्णी विरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक सुवर्णा गोसावी तपास करत आहेत.