महिलेची शरद पवारांबाबत फेसबुक पोस्ट; अश्लील कमेंट करणा-यावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2023 06:02 PM2023-01-05T18:02:44+5:302023-01-05T18:06:29+5:30

शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून त्यांची बदनामी केल्याबाबत पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी तक्रार दिली होती

Woman Facebook post about Sharad Pawar A case has been filed against those who made obscene comments | महिलेची शरद पवारांबाबत फेसबुक पोस्ट; अश्लील कमेंट करणा-यावर गुन्हा दाखल

महिलेची शरद पवारांबाबत फेसबुक पोस्ट; अश्लील कमेंट करणा-यावर गुन्हा दाखल

googlenewsNext

पुणे : पुणे बंद केल्यामागे शरद पवार आणि महाविकास आघाडी असून, हिंदू समाजातील जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम शरद पवार व महाविकास आघाडी यांनी मिळून केले आहे अशा आशयाची पोस्ट एका महिलेने केली होती. त्यावर अश्लील कमेंट करणा-यावर डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पन्नास वर्षीय अनघा घैसास यांनी फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पै.प्रतिकेश वीर अशा फेसबुक अकाऊंट धारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनघा घैसास यांनी 13 डिसेंबर 2022 रोजी पुणे बंद करण्यामागे शरद पवार आणि महाविकास आघाडी आहेत आणि यांनीच हिंदू समाजातील जाती-जातींमध्ये भांडणे लावण्याचे काम केल्याचा आरोप करीत पुणे बंदचा निषेध फेसबुक पोस्टद्वारे केला होता. घैसास यांचे डेक्कन जिमखाना परिसरात सौदामिनी हँडलूम्स नावाचे दुकान आहे. आरोपीने 14 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या पोस्टवर अश्लील कमेंट करीत त्यांच्या दुकानावर बहिष्कार टाकण्याचे आव्हान केले होते. फिर्यादीने तक्रार दाखल करण्यास विलंब लावल्यामुळे 3 जानेवारीला आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक शफी पठाण करीत आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह लिखाण करून त्यांची बदनामी केल्याबाबत पुण्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनीही 16 डिसेंबरला अनघा घैसास यांच्याविरूद्ध डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

Web Title: Woman Facebook post about Sharad Pawar A case has been filed against those who made obscene comments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.