हॉटेलच्या मालकाच्या हत्येप्रकरणी एका महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:10 AM2021-07-29T04:10:42+5:302021-07-29T04:10:42+5:30
याप्रकरणी काजल चंद्रकांत कोकणे (वय १९, रा. बिबवेवाडी, पुणे) हिस अटक करण्यात आली आहे. यापूर्वी हडपसर परिसरातील १७ वर्षे ...
याप्रकरणी काजल चंद्रकांत कोकणे (वय १९, रा. बिबवेवाडी, पुणे) हिस अटक करण्यात आली आहे. यापूर्वी हडपसर परिसरातील १७ वर्षे ३ महिने वयाच्या अल्पवयीन मुलांसह निलेश मधुकर आरते ( वय २३, रा. तुकाईदर्शन, हडपसर, पुणे ), बाळासाहेब जयवंत खेडेकर ( वय ५६ ), निखिल बाळासाहेब खेडेकर ( वय २४, दोघे रा. खेडेकर मळा, उरुळी कांचन, ता हेवेली ), निखिल मंगेश चौधरी ( वय २० ), गणेश मधुकर माने ( वय २०, दोघे रा. कोरेगावमूळ ता हवेली ), प्रथमेश राजेंद्र कोलते ( वय २३, रा उरुळी कांचन, ता. हवेली ), अक्षय अविनाश दाभाडे ( वय २७, रा.सोरतापवाडी, ता हवेली ), करण विजय खडसे ( वय २१, रा. माकड वस्ती सहजपुर ता दौंड ) व सौरभ कैलास चौधरी ( वय २१, रा खेडेकर मळा ता हवेली ) यांना अटक करण्यात आली आहे.
रविवारी (१८ जुलै) रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास उरुळी कांचन येथील प्रसिध्द गारवा हॉटेलचे मालक रामदास रघुनाथ आखाडे ( रा. जावजीबुवाचीवाडी ता. दौंड ) हे त्यांचे हॉटेल मध्ये असताना अल्पवयीन मुलगा व निलेश आरते या दोघांनी आखाडे यांचे डोके, हात व पायावर तलवारीने वार करून गंभीर जखमी केले होते. उपचार चालू असताना ते मंगळवारी (२० जुलै) मयत झाले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार आखाडे यांचेवर हल्ला करण्यासाठी दोन तलवारी आणल्या होत्या. प्रत्यक्षात एकच वापरण्यात आली. अल्पवयीन मुलाने आखाडे यांचेवर हल्ला करून गंभीर जखमी केल्यानंतर तो व निलेश आरते हे दोघे दुचाकीवरून काजल हिचेकडे गेले. व दोन्ही तलवारी तिचे ताब्यात दिल्या. तिने त्या लपवून ठेवल्या. काजल ही आरते याची पत्नी असल्याची माहिती पुढे येत आहे. तपास पोलीस निरीक्षक सुभाष काळे (गुन्हे) हे करीत आहेत.