बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

By admin | Published: January 12, 2016 03:58 AM2016-01-12T03:58:29+5:302016-01-12T03:58:29+5:30

बिबट्याचे हल्ले पुन्हा सुरू झाल्याने जुन्नरच्या पूर्व भागात पुन्हा दहशत पसरली आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका महिलेवर

Woman killed in leopard attack | बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

Next

बेल्हा : बिबट्याचे हल्ले पुन्हा सुरू झाल्याने जुन्नरच्या पूर्व भागात पुन्हा दहशत पसरली आहे. गेल्या आठवड्यात एका महिलेच्या मृत्यूची घटना ताजी असतानाच सोमवारी आणखी एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला. यात ही महिला जागीच ठार झाली.
कल्पना भाऊ गुंजाळ (वय ३२, रा. रानमळा, ता. जुन्नर) असे मृत महिलेचे नाव आहे. ती रानमळा (ता. जुन्नर) येथील मदगुलेमळा शिवारात कांद्याच्या पिकाच्या शेतात आंतरमशागतीचे काम करीत होती. सायंकाळी ४.३०च्या सुमारास कांद्याच्या शेताकडूनच लपत एका बिबट्याने त्यांच्यावर पाठीमागून येऊन हल्ला केला. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या व ओरडल्या. बिबट्याने त्यांना १०० फुटांपर्यंत ओढत फरफटत नेले. या घटनेत कल्पना यांना गंभीर जखमा झाल्या. रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागेवरच मृत्यू झाला.
येथून जवळच असणाऱ्या संभाजी वाघमारे या व्यक्तीने त्यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे फटाके वाजविले. या आवाजामुळे त्या बिबट्याने जवळच्या उसाच्या शेतात धूम ठोकली. वन विभागाने घटनेचा पंचनामा केला आहे. आळेफाटा पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक क्रांतिकुमार पाटील यांनी त्वरित भेट दिली. मात्र, वन खात्याचे कर्मचारी उशिरा आले. (वार्ताहर)

पिंजरा लावणार
पूर्व भागात बिबट्याचे हल्लासत्र पुन्हा सुरू झाल्यामुळे लोकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. पिंजरा लावण्याची मागणी या ठिकाणी असलेल्या संतप्त नागरिकांनी केली. वन खात्याने आश्वासन दिल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले.

Web Title: Woman killed in leopard attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.