गुंगीचा पेढा देऊन महिलेला लुबाडले
By admin | Published: November 26, 2014 11:46 PM2014-11-26T23:46:02+5:302014-11-26T23:46:02+5:30
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पेढा देऊन महिलेला मुलासह गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून ठाण्याच्या बसमध्ये बसवून दिल्याचा धक्कादायक प्रकार वारजे येथे घडला.
Next
पुणो : पत्ता विचारण्याच्या बहाण्याने पेढा देऊन महिलेला मुलासह गुंगीचे औषध देऊन बेशुद्ध करून ठाण्याच्या बसमध्ये बसवून दिल्याचा धक्कादायक प्रकार वारजे येथे घडला. ही महिला तब्बल सहा तास बेशुद्ध होती. या महिलेच्या गळ्यातील दागिने भामटय़ाने लंपास केले.
शीतल मंगेश कुलकर्णी (वय 32, रा. वारजे माळवाडी) यांच्यावर सोमवारी हा प्रसंग गुदरला. त्यांनी वारजे पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी अकराच्या सुमारास कुलकर्णी या मुलाला घेऊन अतुलनगरला चुलतभावाकडे जात होत्या. महामार्गालगत सव्र्हिस रस्ता ओलांडून त्या सागर हॉटेलसमोर आल्या. त्या वेळी तोंडाला रुमाल बांधलेला व गॉगल घातलेला एक जण त्यांच्याजवळ आला. ‘मुंबईला जाणारी बस कुठे मिळेल? शिवाजीनगरला मिळेल का?’ अशी विचारणा केली. कुलकर्णी यांनी चांदणी चौकात बस मिळेल, असे सांगितले. त्यांना धन्यवाद देत त्या भामटय़ाने पेढा खायला दिला. निम्मा पेढा मुलाला देऊन उरलेला पेढा त्यांनी खाल्ला. पेढा खाल्ल्यानंतर दोन ते तीनच मिनिटांत त्यांना गुंगी आली. आरोपीने त्यांना जवळच उभ्या असलेल्या रिक्षात बसवले. त्यानंतर सायंकाळी सहाच्या सुमारास त्यांना शुद्ध आली. तेव्हा ठाणो येथील वंदना एसटी बस आगारामध्ये असल्याचे त्यांना समजले. त्यांचा मुलगाही त्यांच्या सोबतच होता. काही वेळातच त्यालाही शुद्ध आली. त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व कर्णफुले असा एकूण 21 हजार 6क्क् रुपयांचा ऐवज अंगावर नव्हताच. कुलकर्णी यांनी मोबाईलवरून पतीशी संपर्क साधून त्यांना सर्व घटना सांगितली. पतीनेही तातडीने एसटी महामंडळात नोकरीला असलेल्या एका नातेवाइकाला मोबाईलवर संपर्क साधून घटना सांगितली. या नातेवाइकाने तातडीने ठाण्यामध्ये जाऊन या दोघांनाही पुण्यामध्ये आणले. सोमवारी रात्री उशिरा पुण्यात आलेल्या कुलकर्णी यांनी पतीसह मंगळवारी वारजे पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. (प्रतिनिधी)
सीसीटीव्ही फुटेज शोधण्याचा प्रयत्न
आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवण्याचा प्रयत्न केला; परंतु त्यांना फुटेज मिळाले नाही. ज्याने गुंगीचे औषध दिले, त्याला रिक्षाचालकाची मदत झालेली आहे. ही रिक्षा कुठे उभी करण्यात आली, दागिने नेमके कुठे काढून घेतले याचा तपास करण्यासाठी रिक्षाचालकाला शोधण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. ठाण्याच्या एस. टी. स्थानकातील फुटेज मिळवण्याचा पोलिसांचा प्रयत्न असल्याचे सहायक पोलीस निरीक्षक म्हामुनकर यांनी सांगितले.