महिलेला पुढे करून तळेगावात व्यापाऱ्याची ब्लॅकमेलद्वारे लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 12:28 AM2019-03-31T00:28:35+5:302019-03-31T00:28:53+5:30
अपहरण : निर्जनस्थळी नेऊन टोळक्याकडून मारहाण
कामशेत : शहरातील एका प्रतिष्ठित युवा कापड व्यापाऱ्याला मागील काही दिवसांपासून एका अज्ञात महिलेचा फोन येत होता. यातून त्यांचे बोलणे अधिक वाढून महिलेने युवकास भेटण्यास तळेगावला बोलावले. या वेळी युवकाला जांभूळफाटा येथील लॉजवर नेले. त्यानंतर बाहेर आल्यावर चार ते पाच अज्ञात इसमांनी त्याचे अपहरण केले.
पवनानगर-पौड रोड भागात नेऊन इतर दोघा-तिघांनी मिळून त्याला मारहाण केली. तसेच २५ लाख रुपयांची मागणी केली. त्यातील काही पैसे आॅनलाइन बँकिंगच्या माध्यमातून अज्ञात खात्यावर ट्रान्सफर केले. कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी राजेंद्रसिंह इंदरसिंह परमार (वय २५, रा. साईबाबा चौक, कामशेत) यास एका अज्ञात महिलेने फोन केला. तळेगाव एसटी स्थानकावर भेटण्यास बोलावले. तेथून ते लॉजवर गेले. त्या वेळी युवकास लॉजबाहेर थांबलेल्या पाच जणांनी मारहाण केली. त्याचे अपहरण केले.
पवनानगर-पौड रोडने अज्ञातस्थळी नेऊन एका पडक्या घरात कपडे काढून मारहाण केली. युवराज माने यानेही मारहाण केली. तू आम्हाला पंचवीस लाख रुपये दे अशी मागणी केली. त्याच्या खिशातील १५०० रुपये, महागडा मोबाइल जबरीने काढून घेतला. युवकाला धमकावत त्याच्या मोबाईलमधील आॅनलाइन बँकिंग अॅपच्या माध्यमातून सुमारे ९६००० रुपये महिलेच्या खात्यावर ट्रान्सफर केले व २५ लाखातील उर्वरित रक्कम येत्या महिन्याच्या ६ तारखेपर्यंत देण्यासाठी मोबाइलवर व्हिडीओ बनविण्यात आला. पैसे न दिल्यास तुला व तुझ्या घरच्यांना जिवे मारू, अशी धमकी दिली.
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी; महिलेकडून उकळले १५ लाख
1पिंपरी : अश्लील व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून १५ लाख रुपये उकळले. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश भारत पैलवान (रा. वडगाव शेरी, पुणे) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी ३७ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी महिला व आरोपी हे मुंबई येथे एकत्र कामाला होते.
2दरम्यान, आरोपीने फिर्यादी महिलेशी जवळीक निर्माण करून महिलेला मिल्क पावडरचा व्यवसाय करण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर शीतपेयातून गुंगीकारक पदार्थ देऊन शारीरिक संबंध ठेवले. तसेच या घटनेचा व्हीडिओ तयार करण्यासह फोटो काढले. त्यानंतर हा व्हीडिओ व फोटो फिर्यादीस दाखवत ते सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीकडून वेळोवेळी १५ लाख ५० हजार रुपये खंडणी घेतली. त्यानंतरही महिलेला वारंवार लॉजमध्ये नेऊन दारू पाजून फिर्यादीशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच त्याची क्लिप फिर्यादी यांचे नातेवाईक व मित्र परिवारास व्हॉट्सअॅपद्वारे पाठवून फिर्यादीची बदनामी केली.