स्त्री मिळालेल्या संधीचे करतात सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:11 AM2021-02-08T04:11:18+5:302021-02-08T04:11:18+5:30

बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा ...

The woman makes the most of the opportunity she gets | स्त्री मिळालेल्या संधीचे करतात सोने

स्त्री मिळालेल्या संधीचे करतात सोने

Next

बाजीराव रस्त्यावरील सरस्वती मंदिर संस्थेच्या प्रांगणात नगरसेवक व स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने मित्र परिवारतर्फे आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा या सोहळ्यात या महिला बोलत होत्या.

ज्येष्ठ साहित्यिका आरती दातार यांच्या हस्ते नृत्यांगना डॉ.सुचेता भिडे-चापेकर, क्रीडा क्षेत्रातील पद्मश्री शीतल महाजन, पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, सामाजिक कार्यकर्त्या वैशाली भांडवलकर, आरोग्य क्षेत्रातील परिचारिका छाया जगताप यांना स्त्री शक्ती सन्मान पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. यावेळी आमदार मुक्ता टिळक, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, मृणाली रासने, नगरसेवक राजेश येनपुरे, अ‍ॅड. गायत्री खडके, अजय खेडेकर, मनीषा लडकत आदी उपस्थित होते.

आरती दातार म्हणाल्या,

सध्या प्रत्येक क्षेत्रात स्त्रिया अग्रेसर आहेत. कुटुंब सांभाळून सर्व कामे करताना त्यांची तारेवरची कसरत होते. ज्याप्रमाणे यशस्वी पुरुषामागे स्त्री असते. तसेच या विविध क्षेत्रातील यशस्वी स्त्रियांमागे पुरुष देखील आहेत, हे आताचे प्रेरणादायी चित्र आहे.

..............

मानवी मूलभूत गरजांबरोबरच शिक्षण व कला ही देखील प्राथमिक गरज आहे. कलेच्या जाणीवेतून माणूस हा इतर प्राण्यांपेक्षा वेगळा दिसतो. कला माणसातील मनुष्यत्व जागृत ठेवते. त्यामुळे कला ही माणसाला सर्व काही मिळवून देते.

- सुचेता भिडे-चापेकर

.....................

भारतामध्ये पॅराशूट जंपिंग हा आकाशातील खेळ म्हणून ओळखला जातो. सन २०१२ पासून मी भारताचे या क्रीडा प्रकारामध्ये प्रतिनिधीत्व करीत आहे. हे करीत असताना मी पुण्याची असल्याचा अभिमान आहे, असे शीतल महाजन यांनी सांगितले.

..........

कोणाचीही प्रतिकूल परिस्थिती बदलण्यास शिक्षण हेच उत्तम माध्यम आहे. त्यामुळे मुलींना शिक्षणापासून दूर ठेऊ नका. मुलींना जर शिक्षणाच्या योग्य संधी मिळाल्या, तर नक्कीच त्या संधीचे मुली सोने करतील.

- वैशाली भांडवलकर

...............

प्रत्येक महिला ही आपल्या कुटुंबाचा कणा आहे. तो कणा मोडता कामा नये, याकडे महिलांनी लक्ष द्यायला हवे. त्याचा परिणाम पुढील पिढीवर होतो. त्यामुळे शिक्षण व आरोग्य याकडे महिलांनी लक्ष द्यावे.

- मुक्ता टिळक

Web Title: The woman makes the most of the opportunity she gets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.