तीस वर्षीय महिलेचा विनयभंग करून हाताला दिले सिगारेटेचे चटके; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 06:49 PM2021-10-09T18:49:50+5:302021-10-09T18:57:10+5:30
फिर्यादीला दुकान उघडायचे नाही म्हणत पिडीत माहिलेचा हात धरुन मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले
राजगुरुनगर (पुणे): भाड्याने घेतलेले दुकान उघडायचे नाही या कारणावरून दुकान जागा मालकाने ३० वर्षीय महिलेचा विनयभंग केला. दुकान मालकाने महिलेला हातावर पेटत्या सिगारेटचे चटके दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात बापलेकावर गुन्हा दाखल झाला आहे. जगदीश सुभाष आरुडे, सुभाष नामदेव आरुडे रा. पाबळरोड (ता खेड ) अशी आरोपीची नावे आहेत.
या घटनेबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळरोड येथे जोशीवडेवाले शेजारी प्रशांत सुभाष आरुडे यांचे मालकीचे फिर्यादीने गाळा भाड्याने घेतला होता. फिर्यादी व फिर्यादीचा पती दुकान उघडण्यासाठी गेले असता जगदीश आरुडे हा तेथे आला. त्याने फिर्यादीला दुकान उघडायचे नाही म्हणत पिडीत माहिलेचा हात धरुन मनास लज्जा वाटेल होईल असे कृत्य केले.
नंतर डावा हात पिरगळून शिवीगाळ दमदाटी करुन हाताने मारहाण केली. त्यावेळी सुभाष आरुडे हे तेथे आले व पिडित महिलेला एका हाताने मारहाण करुन दुसऱ्या हातात असलेल्या पेटत्या सिगारेटने डावे हातावर चटका देऊन पाठीत सिगारेट टाकली. नंतर शिवीगाळ करत दमदाटी केली. पुढील तपास पोलिस हवालदार बाळकृष्ण साबळे करीत आहे.