महिला पोलीस उपनिरीक्षकाला लाच घेताना पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 04:23 PM2017-10-25T16:23:18+5:302017-10-25T16:26:20+5:30
१५ हजार रूपयांची लाच घेताना कोंढवा पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचार्याला १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले.
पुणे : बलात्काराच्या गुन्हयातील रिपोर्ट पॉझिटिव्ह पाठविण्यासाठी १५ हजार रूपयांची लाच घेताना कोंढवा पोलीस ठाण्यातील एका महिला पोलीस उपनिरीक्षक आणि कर्मचार्याला १५ हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी तीन वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या घटनेने पुणे पोलीस दलात खळबळ उडाली आहे.
उपनिरीक्षक स्वाती मोरे आणि कर्मचारी हर्षल असे पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही कोंढवा पोलीस ठाण्यात सेवा बजावत आहेत. एका बलात्काराच्या गुन्हयातील आरोपीविरूद्ध पॉझिटिव्ह रिपोर्ट पाठवण्यासाठी १५ हजाराची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदाराकडून करण्यात आली होती. त्याची पडताळणी केल्यानंतर लाच मागितली असल्याचे निष्पन्न झाले.