कोर्टात विरोधात साक्ष देण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2019 10:33 IST2019-12-17T10:30:24+5:302019-12-17T10:33:05+5:30
मुलाला जीवे मारण्याची तसेच कोर्टात विरोधात साक्ष देण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्यास खडक पोलिसांनी अटक केली आहे.

कोर्टात विरोधात साक्ष देण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार
पुणे : मुलाला जीवे मारण्याची तसेच कोर्टात विरोधात साक्ष देण्याची धमकी देऊन महिलेवर अत्याचार करणाऱ्यास खडक पोलिसांनी अटक केली आहे.
इरफान मुशर्रफ पटेल (वय ४१, रा़ कोंढवा) असे त्याचे नाव आहे़. याप्रकरणी गणेश पेठेतील ३३ वर्षाच्या महिलेने खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. हा प्रकार १२ व १७ फेबु्रवारी २०१९ रोजी गणेश पेठेत घडला होता़.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, इरफान पटेल याने फिर्यादी महिलेला माझे तुझ्यावर प्रेम आहे़. मला तुझ्याकडून शरीरसुख हवे असे सांगितले़, तेव्हा तिने विरोध केल्यावर तिला पटेल याने शिवीगाळ करुन मारहाण केली़. फिर्यादीच्या मुलाला जीव मारण्याची धमकी देऊन कोर्टात जिवे मारण्याची धमकी दिली़. तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी महिलेला ज्युसमधून गुंगीचे औषध दिले़. त्यामुळे तिला गुंगी असली असताना तिच्यावर बलात्कार केला़. त्यानंतर तिचे अश्लिल फोटो काढले व ते फोटो या महिलेला पोस्टाने पाठविले़. त्यानंतर या महिलेने पोलिसांशी संपर्क करुन फिर्याद दिली असून खडक पोलिसांनी इरफान पटेल याला अटक केली आहे.