इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेने जबरदस्तीने संबंध ठेवून लुबाडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2021 04:12 AM2021-08-15T04:12:41+5:302021-08-15T04:12:41+5:30

पुणे : इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून एका महिलेने तरुणाला भेटायला बोलावले. त्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आपल्या साथीदारांमार्फत ...

The woman, who was identified on Instagram, forcibly snatched the relationship | इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेने जबरदस्तीने संबंध ठेवून लुबाडले

इंस्टाग्रामवर ओळख झालेल्या महिलेने जबरदस्तीने संबंध ठेवून लुबाडले

Next

पुणे : इंस्टाग्रामवरून झालेल्या ओळखीतून एका महिलेने तरुणाला भेटायला बोलावले. त्याबरोबर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर आपल्या साथीदारांमार्फत त्याला लुबाडण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी न्यू पनवेल येथील एका ३१ वर्षांच्या तरुणाने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रगती नाव सांगणाऱ्या महिलेसह तिच्या ३ साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी तरुण व प्रगती असे नाव सांगणारी महिला यांची इंस्टाग्रामवर ओळख झाली. त्यानंतर या महिलेने कोंढव्यातील येवलेवाडी येथे या तरुणाला भेटायला बोलावले. त्यानुसार हा तरुण ७ ऑगस्ट रोजी तिला भेटायला पुण्यात आला. येवलेवाडी येथे या महिलेने त्याला जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्यास भाग पाडले. त्यानंतर फिर्यादी हा तेथून आपल्या कारमधून निघाला. वाटेत तिघांनी त्याला अडवून ते जबरदस्तीने कारमध्ये बसले. त्यांनी फिर्यादीला हाताने मारहाण केली. तसेच प्रगती या इन्स्टाग्राम आयडीवरील महिलेसोबत बलात्कार केला आहे. त्याची पोलिसांत खोटी तक्रार देण्याची धमकी दिली. पैसे दिले नाही तर या महिलेसोबत लग्न करावे लागेल, असे कागदावर लिहून घेतले. त्यावर फिर्यादीची सही व अंगठा घेतला. त्यानंतर फिर्यादी याच्याकडे ५ लाख रुपयांची मागणी केली. तसेच फिर्यादीच्या खिशातील ५० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. त्यानंतर त्यांच्याकडील एटीएम कार्डमधून जबरदस्तीने ३० हजार रुपये काढून घेतले. या घटनेने फिर्यादी तरुण घाबरून जाऊन आपल्या घरी गेला होता. आरोपींकडून उर्वरित पैशांची मागणी होऊ लागल्याने त्याने कोंढवा पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Web Title: The woman, who was identified on Instagram, forcibly snatched the relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.