राज्याची फ्रँचायजी देण्याच्या आमिषाने महिलेची फसवणूक
By admin | Published: June 3, 2017 02:52 AM2017-06-03T02:52:11+5:302017-06-03T02:52:11+5:30
भारत सरकारच्या पंतप्रधान कुशल विकास योजना राबविण्याचा परवाना मिळाला असून, राज्यात या योजनेची फ्रँचायजी देण्याच्या
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : भारत सरकारच्या पंतप्रधान कुशल विकास योजना राबविण्याचा परवाना मिळाला असून, राज्यात या योजनेची फ्रँचायजी देण्याच्या आमिषाने महिलेची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आर्थिक फसवणुकीबरोबरच पैसे परत मागितले तर जीवे ठार मारू, अशी धमकी दिल्याप्रकरणी ग्लोबल स्किलच्या संचालकांविरुद्ध चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्ही. के. शुक्ला आणि अभिषेक वाजपेयी (रा. किडवाहीनगर, कानपूर, उत्तर प्रदेश) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी जयश्री नातू यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबर २०१६ पासून सेनापती बापट रस्त्यावरील प्रतिभा इन्स्टिट्यूट आॅफ रिसर्च अँड टे्रनिंग सेंटर आणि संस्कार सोसायटी संचलित ग्लोबल स्किल, कानपूर उत्तर प्रदेश येथे त्यांचे कामकाज चालते.
संचालक व्ही. के. शुक्ला आणि अभिषेक वाजपेयी यांनी फिर्यादी यांना केंद्र शासनाची आम्हाला पंतप्रधान कुशल विकास योजना राबविण्याबाबत शासनाच्या संबंधित विभागाकडून परवाना मिळाला आहे. ही योजना चालविण्याबाबत फ्रँचायजी देण्याचे आम्हाला अधिकार आहेत, असे सांगून फिर्यादी यांना राज्यासाठी फ्रँचायजीच्या आमिषाने त्यांच्याकडून ५ लाख रुपये घेतले. भारत सरकारच्या पीएमओ आॅफिसकडून ही संस्था बोगस असल्याचे फिर्यादी यांना कळले. फिर्यादीने पैसे मागितले असता ठार करण्याची धमकी दिली.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एन. एम. पालमपल्ले करीत आहेत.