विमेन अचिवर्स / भारती भंडारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 04:28 AM2020-12-16T04:28:47+5:302020-12-16T04:28:47+5:30

6 नोव्हेंबर 1969 हा त्यांचा जन्मदिन. नगर कॉलेजमध्ये त्यांनी बी.कॉम ची पदवी संपादन केली आणि शालेय शिक्षण कन्या विद्या ...

Women Achievers / Bharti Bhandari | विमेन अचिवर्स / भारती भंडारी

विमेन अचिवर्स / भारती भंडारी

Next

6 नोव्हेंबर 1969 हा त्यांचा जन्मदिन. नगर कॉलेजमध्ये त्यांनी बी.कॉम ची पदवी संपादन केली आणि शालेय शिक्षण कन्या विद्या मंदिर शाळेमध्ये झालं. आशापुरा ट्रस्ट,जितो, लायन्स क्लब, संगिनी महिला मंडळ अशा संस्थांशी त्या संलग्न आहेत. संगिनी महिला मंडळ आणि जितो या संस्थांमध्ये अजूनही कार्यरत आहेत. या संस्थांमध्ये संचालक म्हणून त्यांनी कामगिरी सांभाळली आहे. जितो बोर्डावर कार्याध्यक्ष म्हणून त्या काम करत करत आहेत.

संगिनी महिला मंडळ ह्या महिला उत्कर्ष मंडळाची त्यांनी स्वतः स्थापना केलेली आहे. या मंडळाची दर दोन महिन्यांनी बैठक आयोजित केली जाते.

''''''''जितो च्या बीटूबी समितीमध्ये त्या काम करतात. ''''''''बीटूबी''''''''च्या माध्यमातून पुण्याचा अरोरा टाॅवर्स मध्ये जैन समाजातल्या महिलांच्या वस्तूंचे, कलाकृतींचे प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं. त्याला महिलांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. जैन समाजातील महिलांनी तयार केलेल्या वस्तू किंवा पदार्थांच्या या प्रदर्शनामध्ये खाद्यपदार्थ, कपडे अशा गोष्टीं साठी प्रत्येकी दोन तास वेळ प्रदर्शनात देण्यात आला होता. राखी पौर्णिमा किंवा तत्सम सण असतील तर त्या त्या वस्तूंचे प्रदर्शन, खाद्यपदार्थाची जत्रा अशा प्रकारचं महिलांना प्रशिक्षण देऊन प्रदर्शन आयोजित करण्याचं या महिला मंडळाचं वैशिष्ट्य आहे.

यंदा कोरोनामुळे जीतो येथे एक दिवसाचं प्रदर्शन आयोजित केलं होतं.

छोट्या-छोट्या व्यावसायिक महिलांचं अनुभव कथन करायला व्यासपीठ निर्माण झाल्यामुळे महिला मंडळाच्या माध्यमातून महिलांची करमणूक आणि अर्थार्जनाचे साधन अशी दुहेरी कामगिरी होत आहे.

आठ वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या या संगिनी महिला मंडळाच्या 70 ते 75 सदस्य आहेत.

त्यांच्या पतीचा स्वतःचा व्यवसाय आहे. परंतु घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे आणि महिला मंडळांच्या किंवा अन्य संस्थांच्या कामामुळे त्या स्वतःचा व्यवसाय करण्यापेक्षा पतीलाच व्यवसाय मध्ये मदत करतात. भारती यांचा विवाह झाला त्यावेळी त्या मोठी सून म्हणून त्यांच्या घरात आल्या. तेव्हापासून त्यांच्यावर अनेक जबाबदाऱ्या आल्या. त्यांना स्वतःला तीन मुलं आहेत. त्यामुळे त्यांनी कुटुंब सांभाळायचे आणि पतीने व्यवसाय सांभाळायचा असा दोघांनी निश्चित केलं होतं. दिरांचा, मुलींचा विवाह अशा जबाबदाऱ्या कमी झाल्यानंतर त्या सामाजिक कार्यामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून स्वताला झोकून दिलं.

रविवार पेठ येथील वास्तव्य सोडून भंडारी कुटुंब सॅलिस्बरी पार्क येथे स्थायिक झाले. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये काही बदल करायला सुरुवात केली. त्यांच्या पतीला सामाजिक कार्याची खूप आवड आहे. त्यामुळे त्यांनी काही संस्थांशी त्यांचा परिचय करून दिला. धाकट्या मुलीचं लग्न झालं त्यावेळी तिने भारतीताईंना एक पत्र लिहिलं होतं. ते त्यांना दुसऱ्या दिवशी मिळालं. त्यामध्ये मुलीनं लिहिलं होतं की तू आता समाजासाठी आणि स्वतःसाठी जग. कुटुंबासाठी खूप काम केलेलं आहे आणि तेव्हापासून त्यांनी विविध संस्थांची स्वतःला जोडून घेणे सुरू केलं आणि तो त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला. तेव्हापासून जगासाठी जगायला त्यांनी सुरुवात केली.

पती विजय भंडारी आदर्श

आपले पती विजयजी भंडारी हेच प्रेरणास्थान असल्याचे त्या नमूद करतात. ज्यावेळी निराशा आली त्यावेळी एका मित्राच्या भावनेतून ती समजावून घेऊन त्यांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे आपण नैराश्य भावना विसरून जाऊन उत्साहानं कामाला लागलो. पूर्वी सामाजिक संस्थांमध्ये जाण्याचा कंटाळा करत असून परंतु आता त्यासाठी आवर्जून वेळ काढतो असं भारतीताई भंडारी यांनी नमूद केलं.

सूर्यदत्ता इन्स्टिट्यूटचा मानव सेवा पुरस्कार, लायन्स पुरस्कार असे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.

महिलांनी उद्योग व्यवसाय करावा किंवा नोकरी करावी परंतु त्याच वेळी आपल्या कुटुंबालाही चांगला वेळ द्यावा दोन्ही जबाबदाऱ्या महिला समर्थपणे सांभाळू शकतात हे आपण स्वतःच्या उदाहरणावरुन सांगू शकतो असा त्यांचा महिलांना, विशेषतः तरुणींना संदेश आहे.

Web Title: Women Achievers / Bharti Bhandari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.