महिलांना शरीरविक्रयास लावणाऱ्या महिलेस अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 05:22 AM2019-02-21T05:22:30+5:302019-02-21T05:22:41+5:30
घोडबंदर रोडवरील ओवळानाका येथे राहणारी रेणुका ही महिला काही गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून शरीरविक्र याचा व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती.
ठाणे : पैशांचे आमिष दाखवून महिलांना शरीरविक्र यास भाग पाडणाºया रेणुका शिंदे (३५) या महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या पथकाने मंगळवारी रात्री मॉडेला चेकनाका येथील गोपाळआश्रम बार अॅण्ड रेस्टॉरंट येथून अटक करून तिच्या ताब्यातून तीन पीडित महिलांची सुटका केली. याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घोडबंदर रोडवरील ओवळानाका येथे राहणारी रेणुका ही महिला काही गरजू महिलांना पैशांचे आमिष दाखवून शरीरविक्र याचा व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची टीप वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना मिळाली होती. त्याआधारे मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास पोलिसांनी त्याठिकाणी सापळा रचून बनावट गिºहाईक पाठवून या प्रकाराची खात्री केली. त्यावेळी पाच हजारांमध्ये रेणुकाने एका महिलेचा सौदा केला. लोणावळ्यातील हॉटेलमध्ये तिला नेण्याचे ठरले. त्याचवेळी हॉटेल गोपालआश्रममध्ये या पथकाने रेणुकाला ताब्यात घेतले. साईराज आणि उदय या दोघांच्या मदतीने ती हा अनैतिक व्यवसाय करत होती. पाच हजारांमधून पीडित महिलेकडे दोन हजार रुपये सोपवून उर्वरित तीन हजार रुपये ती तिघांमध्ये वाटून घेत होती. तिच्याविरुद्ध पिटा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल असून तिला २५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.