दारूधंदा बंद होत नसल्याने अड्ड्यावर महिलांचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 01:55 PM2020-01-28T13:55:28+5:302020-01-28T13:56:31+5:30
ग्रामस्थ व सुमारे ४० रणरागिणींनी एकत्र होत दारूअड्ड्यावर हल्ला करत धंदा बंद केल्याने बेट भागात दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले.
टाकळी हाजी : पोलिसांकडे तक्रार करूनही गावामधील दारूधंदा बंद होत नसल्याने ग्रामस्थ व रणरागिणींनी एकत्र होत दारूअड्ड्यावर हल्ला करीत धंदा बंद केल्याने बेट भागात दारूधंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
शिरूरच्या पश्चिम भागातीतल टाकळी हाजीच्या साबळेवाडीत प्रजासत्ताक दिनी वाडीतील अवैध दारूधंदे बंद करायचेच या उद्देशाने सुमारे ४० महिलांनी आक्रमक होत येथील हातभट्टीची दारू विकणाऱ्या दोन ठिकाणांवर धडक मोर्चा नेत घराजवळील शौचालयात ठेवलेल्या गावठ्ठी दारूचे भरलेले कॅन सर्वांसमक्ष बाहेर काढून ओतून दिले.
बबन कोंडीबा साबळे यांच्या नेतृत्वाखाली अवैध दारूधंद्यांवर ग्रामस्थांनीच केलेल्या कारवाईत ग्रामपंचायत सदस्य बाबाजी साबळे, भाऊसाहेब साबळे, सोपान औटी, पोपट साबळे, बाळू औटी, विठ्ठल साबळे, राजू साळवे, योगेश साबळे, सुरेश साबळे, योगेश औटी व स्थानिक तरुणांनी सुगंधा गुलाब साबळे, सोनल साबळे, साधना खोमणे, लता साबळे, सिंधुबाई औटी, अलका औटी, जाईबाई साबळे उपस्थित होते.
या कार्यक्रमास साबळेवाडीतील सर्व आजी-माजी ग्रा.पं. सदस्य, चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक तसेच युवक, तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सर्व मुलांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.
.........
सावळेवाडीनजीक असणाऱ्या अवैध दारूविक्रीमुळे महिला, मुलांसह, शाळा व अनेकांना त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच याबाबत पोलिसांना २ वेळा या बाबत कळवूनही हे धंदे सुरूच राहिल्याने अखेर आज वाडीतील महिलांनीच पुढाकार घेत हे हातभट्टी विक्रीचे धंदे बंद पाडले.
याकामी वाडीतील तरुणवर्ग उत्स्फूर्तपणे महिलांच्या पाठीमागे उभा राहिला असून पुन्हा हे धंदे सुरु झाल्याचे निदर्शनास आल्यास पुन्हा याच पद्धतीने महिला व ग्रामस्थ ते बंद करतील असा इशारा ही बाबाजी साबळे व भाऊसाहेब साबळे यांनी दिला आहे.
......
४महिलांनी आज केलेल्या या धडक कारवाईत या कामी पाठिंबा देत बेकायदा हातभट्टी दारू विकणाºयांना समज देत पुन्हा कधीही हे धंदे न करण्याच्या सक्त सूचनादेखील दिल्या. या वेळी साबळेवाडीतील सर्व महिला आक्रमक झालेल्या होत्या.
४तत्पूर्वी सकाळी आज भारतीय स्वातंत्र्याचा ७१ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. साबळेवाडी येथील जि.प. शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.