महिलेचा वाहतुक महिला पोलिसाला चावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 02:04 PM2018-06-27T14:04:42+5:302018-06-27T14:38:34+5:30

सिग्नल तोडल्याने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने महिलेला थांबविले़. त्या रागात पोलीस कर्मचाऱ्यास शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली़.

women bites to trafic police | महिलेचा वाहतुक महिला पोलिसाला चावा 

महिलेचा वाहतुक महिला पोलिसाला चावा 

Next
ठळक मुद्देसिग्नल तोडला : केली धक्काबुक्कीवानवडीत राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल

पुणे : सिग्नल तोडून जात असताना अडविल्याने वादविवाद करुन मोपेडवरील महिलेने वाहतूक शाखेच्या महिला पोलीस कर्मचाऱ्यास चक्क चावा घेऊन ती पळून गेली़ कॅम्पमधील महावीर चौकात ही घटना घडली़.
याबाबत महिला पोलीस हवालदार सुरेखा साबळे यांनी लष्कर पोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. पोलिसांनी वानवडीत राहणाऱ्या एका ३० वर्षाच्या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. साबळे या सोमवारी सायंकाळी सहा वाजता कॅम्पमधील महावीर चौकात वाहतूक नियमन करीत होत्या़. यावेळी मोपेडवरील महिलेने सिग्नल तोडल्याने त्यांनी तिला थांबविले़. त्यामुळे रागात तिने साबळे यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली व धक्काबुक्की केली़. हा प्रकार पाहून त्यांच्या मदतीला एक महिला पोलीस कर्मचारी तेथे आल्या व त्यांनी तिला थांबविण्याचा प्रयत्न केला़. तेव्हा या महिलेने त्यांना चावा घेऊन आपली सुटका करुन घेतली़. लष्कर पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल केला आहे़. 

Web Title: women bites to trafic police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.