स्त्रियांनी समाजात निर्माण केले वेगळे स्थान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:10 AM2021-03-15T04:10:30+5:302021-03-15T04:10:30+5:30

पुणे : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, किरण बेदी यांसारख्या कर्तृत्ववान महिलांमुळे समाजात ...

Women created a different place in society | स्त्रियांनी समाजात निर्माण केले वेगळे स्थान

स्त्रियांनी समाजात निर्माण केले वेगळे स्थान

googlenewsNext

पुणे : ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, किरण बेदी यांसारख्या कर्तृत्ववान महिलांमुळे समाजात स्त्रियांना वेगळे स्थान निर्माण झाले. चूल-मूल सांभाळत या स्त्रियांनी समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. स्त्रिया आहेत, म्हणून पुरुष उत्तम रीतीने आपले काम करु शकतात. त्यामुळे त्यांचा प्रत्येक महिलेने आदर्श घ्यायला हवा, असे मत पुण्याच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी व्यक्त केले.

तुळशीबाग व्यापारी असोसिएशनतर्फे तुळशीबागेतील महिला व्यावसायिकांच्या सन्मान सोहळ्याचे आयोजन तुळशीबाग राममंदिरात केले होते. जनता सहकारी बँकेच्या संचालिका डॉ. मधुरा कसबेकर, संचालिका अ‍ॅड. गौरी कुंभोजकर, नगरसेविका अ‍ॅड. गायत्री खडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रतीक्षा शेंडगे, मृणाली रासने, वैशाली खटावकर, स्वप्नाली पंडित, सुनीता चौहान, दिक्षा माने, विशाखा पवार, चंद्रमा भंडारी, हिना साखरिया, रोहिणी हांडे, स्वाती ओतारी, अभिनेत्री वाळके, मनाली देसाई उपस्थित होते.

महिला व्यावसायिक लता हगवणे, वर्षा ढमाले, रोहिणी इंगळे, डिंपल ठक्कर, वंदना ललवाणी, उज्वला कुलकर्णी यांना सन्मानित केले. शाल, फळांची परडी, मोत्याची माळ, सन्मानपत्र असे सन्मानाचे स्वरुप होते. नितीन पंडित यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Women created a different place in society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.