पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पाच महिला जागीच ठार; १३ जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2023 10:14 AM2023-02-14T10:14:50+5:302023-02-14T10:18:11+5:30

 शिरोली - खरपुडी (ता खेड ) येथील घटना...

Women crushed by vehicle on Pune-Nashik highway; Five women killed on the spot, five seriously, 13 injured | पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पाच महिला जागीच ठार; १३ जखमी

पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात, पाच महिला जागीच ठार; १३ जखमी

Next

राजगुरुनगर (पुणे) :पुणे नाशिक महामार्गावर राजगुरुनगर जवळच्या शिरोली, ता. खेड परिसरात खरपुडी फाट्यावर सोमवारी (दि १३) रात्री पाऊणे अकरा वाजण्याचा सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात पुण्याच्या बाजूने वेगात आलेल्या अज्ञात (महिंद्रा एक्स यु व्ही ) कारने १७ महिलांच्या ग्रुपला जोरदार धडक दिली. यात चार ते पाच महिला वाहनाच्या धडकेत रस्त्यावर पडून अक्षरशः चिरडल्या. त्यातील दोन जागीच ठार झाल्या. तीन रुग्णालयात उपचार सुरु असताना मयत झाली.

सुनंदा सटवा गजेशी, सुशिला वामन देढे (रा.रामटेकडी शांतीनगर ), इंदुबाई कोंडीबा कांबळे (रा.किरकटवाडी सिंहगडरोड पुणे ), सायराबाई प्रभु वाघमारे (रामटेकडी हडपसर पुणे ), या महिला अपघातात मुत्यूमूखी पडल्या. शोभा राहुल गायकवाड, सारीका देवकर, वैषाली लक्ष्मण धोत्रे, शोभा सुभाष शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

अपघातातील मयत व जखमी हे अपघात स्थळापासून जवळच असलेल्या मंगल कार्यालयात वाढपी काम करण्यासाठी स्वारगेट येथून पीएमटी बसने शिरोली येथे उतरल्या होत्या. खरपुडी येथील कृष्णपिंगाक्ष मंगल कार्यालयात मंगळवारी असलेल्या लग्न कार्यक्रमात स्वयंपाक करून वाढपी काम करण्यासाठी (केटरिंग)चे काम करण्यासाठी जात असताना घोळक्याने रस्ता क्रॉस करताना पुणे बाजुकडुन एक पांढरे रंगाची महींद्रा एक्सयुव्ही किंवा टियुव्ही या माँडेलची कार भरधाव वेगात आली.

वाहनाने या सर्वांना जोराची धडक दिली. रात्री अपघात झाल्याने जखमी झालेल्या महिलांचा अंधारात आरडाओरडा झाला. रस्त्यावर रक्ताचा सडा पडला होता. दरम्यान चांडोली ग्रामीण रुग्णालयासह राजगुरूनगर परिसरातील चार ते पाच खासगी रुग्णालयात जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले. या घटनेबाबत शिवानी कैलास माने ( रा.पर्वती दर्शन साईबाबा मंदीरासमोर, सातारा रोड, स्वारगेट) यांनी अज्ञात चालकाविरोधात खेड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Women crushed by vehicle on Pune-Nashik highway; Five women killed on the spot, five seriously, 13 injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.