महिलांचे राहणार वर्चस्व!
By admin | Published: June 28, 2017 03:58 AM2017-06-28T03:58:46+5:302017-06-28T03:58:46+5:30
जुन्नर तालुक्यातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७-१८ करिता प्रभाग रचना
लोकमत न्यूज नेटवर्क
नारायणगाव : जुन्नर तालुक्यातील सर्वांत मोठ्या समजल्या जाणाऱ्या नारायणगाव ग्रामपंचायतीची निवडणूक २०१७-१८ करिता प्रभाग रचना व आरक्षण सोडत मंगळवारी (दि. २७) ग्रामसभेत काढण्यात आली, अशी माहिती निवडणूक अधिकारी योगेश पाडळे यांनी दिली.
नारायणगाव ग्रामपंचायतीच्या सभागृहात प्रभाग रचना व आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तलाठी नितीन चौरे, सरपंच संध्या रोकडे, उपसरपंच संतोष पाटे, संतोष नाना खैरे, संतोष वाजगे, योगेश पाटे, बी. एस कोल्हे, संतोष दांगट, रोहिदास केदारी,ग्रामपंचायत सदस्य, मनसेचे मकरंद पाटे , ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ उपस्थित होते.
नारायणगाव ग्रामपंचायतीची लोकसंख्या २०११च्या जनगणनेनुसार २० हजार ४५६ आहे. एकूण ६ प्रभाग असून, राखीव स्त्रियांसाठी नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी ३ जागा व सर्वसाधारण स्त्री जागेसाठी ६ जागा आरक्षित झाल्या आहेत. १७ जागांपैकी ९ जागांवर स्त्रिया आहेत. अनुसूचित जातीसाठी १ पुरुष, अनुसूचित जमातीसाठी १ पुरुष, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी २ पुरुष , सर्वसाधारण ४ जागा, असे १७ जागांचे आरक्षण काढण्यात आले आहे. प्रभाग रचना पुढील प्रमाणे- वॉर्ड क्र. १ (एकूण ३ जागा)- नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष, वॉर्ड क्र. २- (एकूण २ जागा )-सर्वसाधारण पुरुष, सर्वसाधारण स्त्री,वॉर्ड क्र. ३(एकूण ३ जागा)- अनुसूचित जमातीचा पुरुष, सर्वसाधारण स्त्री, नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, वॉर्ड क्र. ४ (एकूण ३ जागा)- अनुसूचित जातीचा पुरुष, सर्वसाधारण स्त्री ,नागरिकांचा मागास प्रवर्गपुरुष, वॉर्ड क्र. ५ (एकूण ३ जागा)- नागरिकांचा मागास
प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष, वॉर्ड क्र. ६ (एकूण ३ जागा)- नागरिकांचा मागास प्रवर्ग स्त्री, सर्वसाधारण स्त्री, सर्वसाधारण पुरुष .