वेश्या व्यवसायातील महिला आपल्यापेक्षा लहान ठरत नाहीत; डॉ. रमण गंगाखेडकरांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 07:13 PM2022-03-03T19:13:10+5:302022-03-03T19:13:19+5:30

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विविध योजना राबवून जर त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले

Women in the prostitution business are no less than us Dr. Raman Gangakhedkar's opinion | वेश्या व्यवसायातील महिला आपल्यापेक्षा लहान ठरत नाहीत; डॉ. रमण गंगाखेडकरांचे मत

वेश्या व्यवसायातील महिला आपल्यापेक्षा लहान ठरत नाहीत; डॉ. रमण गंगाखेडकरांचे मत

Next

पुणे : माणसाने माणसाला बरोबरीची वागणूक द्यायला हवी. वेश्या व्यवसाय करणारे आपल्यापेक्षा लहान ठरत नाही, हे जोपर्यंत आपल्याला वाटणार नाही तोपर्यंत आपली उन्नती होणार नाही. आज स्वच्छच्या माध्यमातून या महिला कचरा साफ करत आहेत, परंतु लोकांच्या मनात या महिलांबद्दल जो विचारांचा कचरा आहे. तो आपण सगळे मिळून साफ करुया, असे मत पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी व्यक्त केले. 

पुण्यातील बुधवार पेठेतील सहेली संघाच्या वतीने नवी पेठेत पत्रकार भवन येथे क्लिन रेड प्रकल्पाच्या वर्षपूर्ती निमित्त छायाचित्र कथा प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. 

 गंगाखेडकर म्हणाले, वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी विविध योजना राबवून जर त्यांना सन्मानाचे स्थान मिळवून दिले, तर त्याही विचार करतील की दुस-या प्रकारे देखील मेहनतीच्या जोरावर पैसे कमवू शकतो. कोणतीही बाई या व्यवसायात आनंदाने जात नसते. त्यामुळे या महिलांसाठी काय करता येईल, याचा विचार देखील समाजातील नागरिकांनी करायला हवा. 

Web Title: Women in the prostitution business are no less than us Dr. Raman Gangakhedkar's opinion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.