महिलांनी तणावमुक्त जीवन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:11 AM2021-02-14T04:11:33+5:302021-02-14T04:11:33+5:30
सांगवी: महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन तणावमुक्त जीवन जगावे. आरोग्याबाबत वेळीच व्यक्त होऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. त्यामुळे ...
सांगवी: महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेऊन तणावमुक्त जीवन जगावे. आरोग्याबाबत वेळीच व्यक्त होऊन डॉक्टरांचा योग्य सल्ला घ्यावा. त्यामुळे महिलांची आरोग्यदायी जीवनाकडे वाटचाल होईल, असे आवाहन डॉ. निकिता मेहता यांनी केले आहे.
बारामती शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने व डॉ. सेलचे अध्यक्ष डॉ.सचिन बालगुडे यांच्या संयुक्त विद्यमाने वाण आरोग्याचे हा कार्यक्रम बारामतीत आयोजित करण्यात आला होता. या वेळी डॉ. मेहता महिलांना विविध आजारांविषयक मार्गदर्शन करताना बोलत होत्या. पुढे त्यांनी महिलांमध्ये असणाऱ्याºपाळीच्या तक्रारी, वंध्यत्व, कॅन्सर, किशोरवयीन मुली, डिप्रेशन, आहार अशा अनेक विषयांवर महिलांना मार्गदर्शन केले. तसेच डॉ. सचिन बालगुडे यांनीदेखील महिलांना मार्गदर्शन केले.
तसेच, या वेळी महिलांची मोफत नोंदणी व तपासणी करण्यात आली. या वेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, शहर महिला राष्ट्रवादी अध्यक्षा अनिता गायकवाड, तालुकाध्य़क्षा वनिता बनकर, डॉ. जाधव, ज्योती लडकत, सुप्रिया बंगे,आशा पर्यवेक्षिका करे तसेच महिला उपस्थित होत्या.